बॉलीवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी पती सैफ अली खानवर एका चोराने चाकू हल्ला केला. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला. या प्रसंगात करीना सैफच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळाली. तसंच या घटनेमुळे ती मुलांची अधिक काळजी घेताना दिसत आहे. नुकतीच करीनाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली होती. ज्यामुळे चाहते चिंतेत पडले असून एकच गोंधळ उडाला आहे.

करीना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, तुम्हाला लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, एखाद्या आपल्यातल्या व्यक्तीला गमावणं, पालकत्व हे कळणार नाही. जोपर्यंत वास्तवात तुमच्याबरोबर हे घडल्याशिवाय, आयुष्यातल्या परिस्थितींबद्दल आणि सिद्धांत हे कधीच समजणार नाही. तुम्हाला वाटतं असेल, तुम्ही दुसऱ्यापेक्षा अधिक हुशार आहात. पण, जोपर्यंत आयुष्यात तुमच्यावर ती वेळ येत नाही आणि तुम्हाला नम्र करत नाही तोपर्यंत हे वाटतं राहिलं.

या पोस्टबरोबर करीना कपूरने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होतं आहे. त्यामुळे करीनाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. नेमकं काय झालंय? असं चाहते विचारत आहे. तसंच सर्वकाही ठीक आहे ना? काही समस्या आहे का?, असं देखील चाहते विचारत आहेत.

Kareena Kapoor Post
Kareena Kapoor Post

काही दिवसांपूर्वी करीना कपूर आणि सैफ अली खानने विनंती केली होती की, त्यांच्या मुलांचे फोटो घेऊ नका. त्यांना प्रायव्हसी द्या. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतला होता.

दरम्यान, करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झां तर, ती शेवटची हंसल मेहता दिग्दर्शित ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये झळकली होती. आता लवकरच करीना मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनाबरोबर अभिनेता आयुष्यमान खुराना प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Story img Loader