अलिबाग हे मुंबईजवळ समुद्रकिनारी वसलेलं शहर आहे. हे बीच डेस्टिनेशन सेलिब्रिटींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यानंतर आता अभिनेत्री क्रिती सेनॉननेही या शहरात मालमत्ता विकत घेतली आहे. कृती सेनॉनने अलिबागमध्ये 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या प्रोजेक्टमध्ये २००० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. क्रितीने स्वतःच अलिबागमधील तिच्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे. “आता मी 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' यांच्या सोल दे अलिबागमधील एक आनंदी जमीन मालक आहे. स्वत: जमीन खरेदी करणे हा एक सक्षमीकरणाचा प्रवास होता आणि माझं लक्ष अलिबागमध्येच जमीन खरेदी करण्याकडे होतं. मी काय शोधत आहे याबद्दल हे मला स्पष्ट होतं. मला शांतता, गोपनीयता आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये एक उत्तम गुंतवणूक हवी होती. माझे वडीलही या गुंतवणुकीबद्दल उत्साहित होते. मांडवा जेट्टीपासून २० मिनिटांपेक्षा कमी अंतरावर अलिबागच्या अगदी मध्यभागी हा भूखंड आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' यांनी माझ्यासाठी ही जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया खूप सोपी केली. अलिबागमध्ये गुंतवणुकीसाठी यापेक्षा चांगली वेळ नाही,” असं क्रितीने म्हटलं आहे. पासपोर्ट, पैसे अन् १० लाखांचे सामान लुटले; अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला विदेश ट्रिपवर आला वाईट अनुभव क्रिती अमिताभ बच्चन यांची शेजारीण होणार आहे. बच्चन यांनी एप्रिलमध्ये याठिकाणी. त्यांनी या परिसरात १० हजार चौरस फूट जमीन खरेदी केली होती. क्रितीने अलिबागमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बंगळुरूमधील आणि गोव्यातील व्हिलामध्येही गुंतवणूक केली आहे. https://www.instagram.com/p/C7l8Df1IHbH/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== ५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम फक्त अमिताभ बच्चन व क्रिती सेनॉनच नाही, तर शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याकडे अलिबागमध्ये सुंदर घर आहे. त्यांचा हा आलिशान बंगला २० हजार स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त परिसरात पसरलेला आहे. या आकर्षक बंगल्याची किंमत १५ कोटी रुपये आहे आणि तिथे स्विमिंग पूलसह गार्डन आहे. याशिवाय शाहरुखची लेक सुहानाने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधीच अलिबागमध्ये दीड एकर शेतजमीन विकत घेतली होती, या जमिनीची किंमत १२.९१ कोटी रुपये होती. सुहानाची शेतजमीन अलिबाग शहरापासून १२ मिनिटांच्या अंतरावर आहे. https://www.instagram.com/p/C6sf_KgIIoX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== बॉलीवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचाही अलिबागमध्ये समुद्रकिनारी एक आलिशान बंगला आहे. या जोडप्याने २०२१ मध्ये अलिबागमधील बंगला २२ कोटी रुपयांना विकत घेतला होता, असं वृत्त एएनआयने दिलं होतं.