आपल्या डान्सने आणि कातिल अदांनी घायाळ करणारी बॉलीवूडची अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. एकाबाजूला तिच्या वडिलांनी केलेली आत्महत्या आणि दुसऱ्याबाजूला अर्जुन कपूरबरोबर झालेला ब्रेकअप. मलायका संबंधित या दोन विषयावर सध्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्री मलायका अरोरा स्वतःच्या फिटनेसवर किती मेहनत घेते हे सर्वश्रुत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फिटनेसबाबत प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असते. अशातच मलायकाने नोव्हेंबर महिन्यातील आव्हानांची यादी शेअर केली होती; जी सध्या व्हायरल झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

मलायका अरोराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नोव्हेंबर महिन्यात कोणती काळजी घ्यावी, काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत सांगितलं आहे. यामध्ये एकूण नऊ आव्हाने आहेत. अल्कोहोल सोडणे, ८ तास झोप, मार्गदर्शकाची गरज आहे, दररोज व्यायाम करणं, दररोज १० हजार पावलं चालणं, सकाळी १० वाजेपर्यंत उपवास, प्रक्रिया केलेलं अन्न टाळणं, रात्री ८ नंतर न जेवणं, टॉक्सिक लोकांपासून दूर राहणं अशी नऊ आव्हाने मलायकाने स्वीकारली आहेत.

हेही वाचा – ‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाल्याचं निश्चित झालं. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अर्जुनने सध्या सिंगल असल्याचं सांगतलं. २०१८पासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनी नातं गुप्त ठेवलं होतं. पण काही काळानंतर दोघांनी जगजाहीर केलं. सोशल मीडियावर दोघं सतत रोमँटिक फोटो शेअर करत होते. अनेक कार्यक्रमांना मलायका आणि अर्जुन एकत्र हजेरी लावत होते. पण, आता दोघांचा ब्रेकअप झाला असून बऱ्याचदा दोघं सोशल मीडियावर याविषयी पोस्ट शेअर करत असतात.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

दरम्यान, मलायका अरोराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘येक नंबर’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाच्या शीर्षकगीतावर तिने डान्स केला होता. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ जाधव पाहायला मिळाला.

Story img Loader