२०२५ या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. जगभरात नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. बॉलीवूडचे कलाकारदेखील नवीन वर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करताना पाहायला मिळत आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रिटींनी ग्रँड स्टाइलमध्ये नवीन वर्ष साजरं केलं. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच एका अभिनेत्रीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी नवीन वर्षानिमित्ताने पार्टीचं आयोजन केलं होतं. अशाच एका पार्टीतून एक लोकप्रिय अभिनेत्री बाहेर येत असताना जोरात पडली. तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडली, किस करताच अनुष्का मराठीत म्हणाली, “मी मेकअप लावलाय…”

ही लोकप्रिय अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मौनी रॉय आहे. मौनी रॉयने पती सूरज नांबिया आणि दिशा पटानीसह जवळच्या मित्रमंडळीबरोबर नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. याच पार्टीतून बाहेर पडल्यानंतर मौनी रॉय स्वतःला सावरू शकली नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्स घालून पार्टीतून बाहेर येताना मौनी रॉय दिसत आहे. यावेळी तिच्या पुढे पती सूरज असून मागे दिशा पटानी पाहायला मिळत आहे. तेव्हाच मौनी हाय हिल्समुळे फुटपाथवर जोरात पडते. हे पाहून लगेच पती सूरज मागे फिरतो आणि मौनीला उचलतो. त्यानंतर तो अभिनेत्रीला सावरत गाडीत बसवतो. याच व्हिडीओमुळे मौनी रॉय सध्या चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे. तसंच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…

या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ती सुखरुप असावी, अशी आशा आहेत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मौनीचा तोल गेला असावा, असं वाटतंय.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “पार्टीत जास्तचं नशा केली आहे वाटतं.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मौनी शुद्धीत वाटतं नाहीये. या व्हायरल व्हिडीओवर मौनीची आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला कधीच माफ करणार नाही…”, चाहत पांडेची आई अविनाश मिश्रावर भडकली, ‘स्त्रीलंपट’चा टॅग देत म्हणाली…

दरम्यान, मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘सलाकार’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शित फारुक कबीरने केलं आहे. याशिवाय अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात मौनी झळकणार आहे. तसंच मोहित सूरीच्या ‘मलंग २’मध्येदेखील ती दिसणार आहे.

Story img Loader