बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेकवर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नुकतंच त्यांच्या मुलीचे मसाबाचे लग्न झाले आहे. त्यामुळे त्या खुश आहेत. नीना गुप्ता कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतात तसेच बॉलिवूड चित्रपटांविषयीदेखील बोलत असतात.
नीना गुप्ता बॉलिवूड बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात, फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भूमिकांविषयी, त्यांच्या सेकंड इनिंगबद्दल भाष्य केलं आहे. त्या असं म्हणाल्या, ‘बधाई हो’ चित्रपटाने माझ्या करियर पुन्हा सुरु झाले. जर तो चित्रपट फ्लॉप ठरला असता तर मी पुढे छोट्याच भूमिका केल्या असत्या. आता मला मोठ्या भूमिका मिळत आहेत. आपल्या प्रत्येकाला मोठा ब्रेक मिळणं गरजेचं आहे. हो माझा नियतीवर विश्वास आहे.”
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “माझ्यासाठी हा एक चांगला काळ आहे. मला चांगल्या भूमिका मिळाल्याबद्दल मी देवाची आभारी आहे. मी सध्या माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे जेणेकरून मला काम करता येईल. आमच्याकडे कामाची वेळ खूप जास्त असते. कधी रात्री काम करावे लागते. सकाळी ६ ते संध्यकाळी ६ या वेळेमुळे मी खूपच थकून जाते. पण काम आहे ते करावे लागणार.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नीना गुप्ता नुकत्याच ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ या चित्रपटात झळकल्या होत्या. बधाई दो चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची पसंतीच मिळवली नाही तर अनेक पुरस्कारदेखील जिंकले आहेत.