बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीतीला आम आदमी पार्टीचे(आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर परिणीती व राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.

आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीती व राघव चड्ढा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. परिणीती व राघव चड्ढा यांचा फोटो ट्वीट करत “राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा” असं खासदार संजीव अरोरा म्हणाले होते. त्यानंतर परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता परिणीतीने राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ लाइक केला आहे.

Ranbir kapoor
“मी बॉलीवूडमधील दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि माझी ओळख…”,रणबीर कपूरचा खासगी आयुष्यावर खुलासा
Kangana Ranaut And Javed Akhtar
कंगना रणौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची न्यायालयाकडे मागणी
Nick Jonas and Priyanaka Chopra
निक जोनासने सहा वर्षांपूर्वी प्रियांकाला घातली होती लग्नाची मागणी; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Kareena Kapoor And Saif ali Khan
आमचं ‘या’ गोष्टीवरून होतं भांडण, करिना कपूर खानने केला सैफ अली खानबरोबरच्या वादावर खुलासा
Priyanka Chopra
“त्यानंतर प्रियांकाच्या खूप तक्रारी आल्या”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला देसी गर्लबरोबर काम करण्याचा अनुभव
Arjun Kapoor And Malayka
सकारात्मक राहिलं की गोष्टी सकारात्मक होतीलच असं नाही; अर्जुन कपूरचा रोख मलायकावर?
Rajesh Khanna
“टाइम हो गया, पॅक अप”, अमिताभनं सांगितले राजेश खन्नाचे शेवटचे शब्द
Krishnan kumar and Tishaa kumar
अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचे कर्करोगाने वयाच्या २१ व्या वर्षी निधन
Emraan Hashmi And Mahesh Bhatt
दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका करण्याविषयी महेश भट्ट यांनी दिला होता इशारा; इमरान हाश्मीने सांगितली ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटाची आठवण

हेही वाचा>> “मी संसार टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले, पण…” समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य, म्हणाली “नागाचैत्यनबरोबर घटस्फोट घेण्याचा…”

हेही वाचा>> आत्महत्येच्या तीन दिवसांनी आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर, बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार

राघव चड्ढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला परिणीती चोप्राने लाइक केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “दिख रही है आपकी नीती, राजनीती वाली” असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने “सगळं काही परिणीतीसाठी होत आहे”, अशी कमेंट केली आहे. “बॉलिवूड वाइब” असंही एकाने म्हटलं आहे.

raghav chadha news

“लवकर लग्न करा सर, तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसते” अशी कमेंट एकाने केली आहे.

raghav chadha parineeti chopra

“लग्नाची तारीख सांगा चड्ढा साहेब” असं एकाने म्हटलं आहे. “काय व्यक्तिमत्व आहे. परिणीतीची पसंत चांगली आहे”, अशी कमेंटही केली आहे. “राजनीती ते परिणीतीपर्यंतचा प्रवास”, असंही एकाने म्हटलं आहे.

raghav chadha parineeti chopra

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेताना परिणीती व राघव चड्ढा यांची ओळख झाली. तेव्हापासून ते मित्र आहेत. इन्स्टाग्रामवरही ते एकमेकांना फॉलो करतात.