scorecardresearch

दाक्षिणात्य चित्रपटात काम करायला आवडले का? परिणीती चोप्रा म्हणाली, “आयुष्यात…”

कोणी महान दिग्दर्शक मला ओळखत असेल तर कृपया मला घ्या

दाक्षिणात्य चित्रपटात काम करायला आवडले का? परिणीती चोप्रा म्हणाली, “आयुष्यात…”
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दाक्षिणात्य चित्रपटांची सध्या हवा आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमागे टाकत आज दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. कांतारा ]सारख्या चित्रपटात एकही मोठा स्टार नसताना ता चित्रपटाने इतिहास रचला आहे. ज्याप्रमाणे दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूडमध्ये काम करतात त्याचपद्धतीने बॉलिवूड अभिनेतेदेखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसतात. सलमान खान नुकताच गॉडफादर चित्रपटात दिसला होता. आता बॉलिवूडच्या बबली गर्ल अर्थात परिणीती चोप्राला दाक्षिणात्य चित्रपटात काम करायचे आहे.

परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बहीण प्रियांका चोप्रा आज हॉलिवूडमध्ये आहे मात्र परिणीती बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. आजतकशी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलताना ती असं म्हणाली, कोणीही कल्पना करू शकत नाही इतकी मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी उतावळी झाले आहे. मी खूप दिवसांपासून दुसऱ्या भाषेतील चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम किंवा कन्नड असो, मला चित्रपटाचा एक भाग व्हायचे आहे. मला फक्त एक चांगला चित्रपट, कथा आणि दिग्दर्शक पाहिजे जो एक उत्कृष्ट कलाकृती तयार करू शकतील. “, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.

परिणीती नुकतीच ‘उंचाई’ या चित्रपटात दिसली होती. परिणितीने आपल्या करियरची सुरवात यशराज फिल्म्समध्ये जनसंपर्क विभागातून केली आहे. ‘लेडीज वर्सेस बेहल’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ‘इशकजादे’, ‘हसी तो फसी’, ‘केसरी’, ‘शुध देशी रोमान्स’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून तिने काम केले आहे. ‘गोलमाल ४’ चित्रपटातून ती एक वेगळ्या भूमिकेतून दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:31 IST

संबंधित बातम्या