सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आणि त्यातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद रंगला आहे. मध्य प्रदेशमधील इंदौर शहरात या गाण्याविरोधातील आंदोलन करण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे. या वादामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वेगवेगळ्या स्तरातून आता या वादावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी हिने मात्र वेगळंच विधान करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा वाद पूर्णपणे बिन बुडाचा आहे आणि याला काहीच अर्थ नासल्याचं पायलने स्पष्ट केलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पायल म्हणाली, “माझ्यामते हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत. एखाद्या रंगाला उद्देशून वाद निर्माण करणं चुकीचं आहे, दीपिकाच्या बिकिनीवर कोणत्याही सनातन धर्मातील देवी देवतांचे फोटो नाहीयेत. केवळ एका विशिष्ट रंगावरून एखाद्या कलाकृतीला विरोध कसा करता येऊ शकतो?”

woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

आणखी वाचा : बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल विवेक ओबेरॉयने मांडलं परखड मत; म्हणाला, “माझ्या वडिलांनी…”

शिवाय पायल ज्या रीयालिटि शोमध्ये सहभागी होती त्याचा युनिफॉर्मसुद्धा भागव्या रंगाचा होता असंही तिने स्पष्टीकरण दिलं आहे. पुढे पायल म्हणते, “अशा गोष्टीवरून वाद उत्पन्न करणारी माणसं ही मूर्ख आहेत. अशा पद्धतीने विरोध करून चित्रपटाचं नुकसान नव्हे तर त्याला आणखी फायदा होणार आहे. सीएएच्या वेळी मी स्वतः दीपिकाच्या विरुद्ध मत मांडलं होतं. पण आत्ता मात्र तिला उगाचच टार्गेट केलं जात आहे.”

इतकंच नव्हे तर या गाण्यातील दीपिकाच्या हॉट लूकवर टीका टिप्पणी करणाऱ्या आणि तिला अश्लील म्हणणाऱ्या लोकांचाही पायलने समाचार घेतला आहे, पायल म्हणते, “जर दीपिका यात तुम्हाला अश्लील वाटत असेल तर मग आपल्याच देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता. इथे आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे. उगाचच भगव्या रंगाचा आधार घेऊन या वादाला आणखी मोठं होण्यापासून रोखलं पाहिजे. असं असेल तर हिरव्या रंगसुद्धा एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तर मुलींनी हिरवी बिकिनी परिधान करणंसुद्धा सोडून द्यायला हवं का?” एवढंच नव्हे तर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केलेल्या वक्तव्यावरही पायलने विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा – Pathan Controversy : दीपिका पदुकोणची ‘बेशरम रंग’मधील भगवी बिकिनी वादाच्या केंद्रस्थानी; पण या बिकिनीचा डिझायनर कोण?

‘पठाण’ हा चित्रपट तसा आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या नवीन गाण्यामुळे हा वाद आणखी वाढू शकतो अशी शक्यता आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.