अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…”

अभिनेत्रीच्या या ट्वीटनंतर चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

Pooja-Bhatt
अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. कोविडची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोविडने आता बी टाऊनमध्येही धुमाकूळ घातला आहे. अनेक कलाकार जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात येऊ लागले आहेत. बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना करोना झाला आल्याची बातमी अलीकडेच आली होती. ही बातमी ताजी असताना आता बॉलिवूड अभिनेत्री पूजा भटलाही करोना झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजाने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा- “भारतातल्या मुली आळशी आहेत” सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ विधानावर उर्वशी रौतेलाचं भाष्य, म्हणाली “ज्या मुली…”

प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच ट्विट केले की ती कोरोनाच्या विळख्यात आली आहे. पूजाने ट्वीट करत लिहिले आहे की. “३ वर्षांनंतर मी प्रथमच कोविड पॉझिटिव्ह झाली आहे. कोविड आपल्या खूप जवळ येऊन पोहचला आहे. लस घेऊनही तुम्हाला कोविड होऊ शकतो. आशा करते की मी लवकरच माझ्या पायावर परतेन.” तसेच सगळ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहनही पूजाने केलं आहे.

या ट्विटसोबत तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये कोविड आणि लॉकडाऊनचे अनेक जुने व्हिडिओ आहेत. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना भांडी वाजवण्याचे आवाहन केले होते. ३ वर्षांपूर्वी पीएम मोदींच्या सांगण्यावरून लोकांनी भांडी वाजून करोनाला देशातून पळवून लावला असल्याचा टोमणाही तिने लगावला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:12 IST
Next Story
“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”
Exit mobile version