Bollywood Actress Cheated On By Ex-Boyfriend : बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अलीकडेच तारा सुतारिया व वीर पाहारिया, खूशी कपूर व वेदांग रैना यांचं ब्रेकअप झालं अशा चर्चा सुरू होत्या. अशातच आता लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीनेही तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.

रिलेशनशिपमध्ये असताना आपला बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींशी चॅटिंग करत होता आणि त्याने इमोशनल चिटिंग केली आहे असा आरोप बॉलीवूड अभिनेत्री शनाया कपूरने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर केला आहे. रिलेशनशिप अडव्हाजइवर तिने याबद्दल सांगितलं आहे. शनाया याबद्दल नेमकं काय म्हणाली, याबद्दल जाणून घेऊयात….

बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली शनाया?

शनाया याबद्दल म्हणाली, “मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर परदेशात होते. तेव्हा मी विचार करत होते, वाह किती छान सुरू आहे सगळं. किती छान आयुष्य जगतीये मी. हे रिलेशनशिप सर्वात भारी आहे. आम्ही डिनरसाठी बाहेर जाणार होतो आणि तो अंघोळीला जात होता. त्याने मला तू तोपर्यंत गाडी का बुक करत नाही असं म्हणाला.”

Award Banner

शनाया याबद्दल पुढे म्हणाली, “मी म्हटलं माझा फोन डेड झाला आहे. मी तुझा फोन वापरू का? त्यावर तो हो, माझा फोन घे आणि त्यावरून गाडी बुक कर अस म्हणाला. त्यानंतर मी त्याचा फोन अनलॉक केला. मला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव माहिती होतं, त्यामुळे तिचा मेसेज पाहिल्यानंतर माझं असं झालं की हे बरोबर नाहीये. मग सहाजिकच मी ती चॅट वाचली. मी म्हटलं एका मुलीचा मॅसेज आहे ठीक आहे, पण, दुसऱ्या मुलीचा, तिसऱ्या मुलीचा, चौथ्या असं करत मला पाच मुलींशी तो बोलतोय हे कळलं. ते पाहून माझं असं झालं की, नाही असं होऊ शकत नाही.”

शनायाने पुढे सांगितले की, “तेव्हा मी त्याच्या फोनवरून ते स्क्रीनशॉट काढले आणि त्याचे फोटो मैत्रिणींना पाठवले आणि सांगितलं की माझ्याबरोबर असं घडतंय, मी काय करू? माझी मैत्रीण अनन्या पांडे त्या लोकेशनपासून जवळ असल्याने मला म्हणाली की ट्रेन पकडून माझ्याकडे ये. मी म्हटलं मी तसं नाही करू शकत. त्यानंतर पूर्ण वेळ मी आनंदी आहे असा खोटा भासवत होते.”

शनायाने सांगितलं की, ती तीन दिवस सर्व काही ठीक असल्याचं भासवत होती. पण, तिला अडकून पडल्यासारखं वाटत होतं. शेवटी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली आणि तिला शांत करण्यासाठी त्याने तिला महागडे कानातले विकत घेतले.

ती म्हणाली, “त्याने ते फक्त मला दिले, मी बॅग घेतली आणि म्हणाले, तुझी चूक मी माफ करावी म्हणून भेट देतोयस का? मी खूप संतापले, पण ते कानातले अजूनही माझ्याकडे आहेत. मी ते अजूनही घालते… ते मी कमावले आहेत. ते माझेच कानातले आहेत.” शनायाने सांगितलं की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने “मी असं काय मोठं झालं? हे फक्त मेसेजिंग होतं; शारीरिक संबंध तर नव्हते,” असं स्पष्टीकरण देत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर शनायाने सांगितलं की ती भावनिक फसवणूक होती.