९० च्या दशकात ‘खुदा गवाह’, ‘गज गामिनी’, ‘आंखें’, ‘मृत्युदंड’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या चित्रपटसृष्टीपासून बरीच लांब गेली आहे. मध्यंतरी ‘छैया छैया’ गाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती. चित्रपटसृष्टीत तिला मिळालेली वागणूक आणि तिचा अनुभव याविषयी तिने केलेलं वक्तव्य चर्चेत होतं.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये शिल्पाने पुन्हा यावर भाष्य केलं आहे. शारीरिक ठेवणीवरून तिला बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा टोमणे ऐकावे लागले याविषयी तिने खुलासा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “आजच्या घडीला जर मी चित्रपटसृष्टी पुनरागमन करायचं ठरवलं तर मला काम मिळणार नाही. ९० च्या दशकातच मला जाडी असल्याने बऱ्याचदा नाकारलं होतं. त्यामुळे सध्या तो विचार न केलेलाच बरा. फराह खानने मला ‘छैया छैया’ गाण्यासाठीही विचारलं होतं, पण नंतर मी खूप जाड आहे म्हणून माझ्याऐवजी त्यांनी मलायकाला घेतलं.”

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

आणखी वाचा : “मी जुहू बीचवरील वाळू न्यूयॉर्कमध्ये नेली, कारण…” वीर दासच्या ‘या’ विचाराचं होतंय कौतुक

एकंदरच चित्रपटसृष्टीतील बदल आणि नव्या कलाकारांच्या स्ट्रगलबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, “आमच्या वेळी आम्हाला प्रत्येक चित्रपटातून काहीतरी नवीन शिकायला मिळायचं, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सगळे एकमेकांमध्ये मिळून मिसळून काम करायचे. सध्या या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली आहे, त्यामुळे सध्याच्या तरुणांना या क्षेत्रात एकदा अपयशी ठरल्यावर दुसरी संधी मिळणं जरा कठीणच आहे.”

शिल्पा ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची मोठी बहीण आहे. नम्रता शिरोडकरही चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. चित्रपटक्षेत्रापासून फारकत घेतल्यावर शिल्पा शिरोडकरने ब्रिटनमधील बँकर अपरेश रणजीत यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना १९ वर्षांची मुलगीदेखील आहे.