Shilpa Shetty Dance On Taambdi Chaamdi Song : महाराष्ट्राच नव्हे तर जगभरात सध्या एका मराठी गाण्याचा डंका आहे ते म्हणजे ‘तांबडी चामडी’. सोशल मीडियावर या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. श्रेयस सागवेकरने लिहिलेलं आणि कृणाल घोरपडेने संगीतबद्ध केलेलं ‘तांबडी चामडी’ गाण्याने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. अशा या रेकॉर्ड ब्रेक गाण्याची भुरळ बॉलीवूड सेलिब्रिटींनाही पडली आहे. नुकतीच शिल्पा शेट्टी ‘तांबडी चामडी’ गाण्यावर हटके डान्स करताना पाहायला मिळाली.

याआधी अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख आपल्या मित्रमंडळीसह ‘तांबडी चामडी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) ‘तांबडी चामडी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
a hilarious viral video
Video : “चकली की चकला” भावाने बनवली अशी चकली की बहि‍णीने धू धू धुतले, पाहा बहीण भावाचा मजेशीर व्हिडीओ
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”

“तांबडी चामडी आणि चेंबूर”, असं कॅप्शन लिहित शिल्पाने ( Shilpa Shetty ) तिचा हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा तिच्या अनोख्या आणि मजेशीर अंदाजात नाचताना दिसत आहे. ‘तांबडी चामडी’ या मराठी लोकप्रिय गाण्यावरील शिल्पाच्या हटके डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘सिंघम अगेनच्या’मधील एका अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगणला २-३ महिने…, सलमान खानने सांगितला ‘तो’ प्रसंग

शिल्पाच्या ( Shilpa Shetty ) डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिल्पाचा पती राज कुंद्राने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं आहे, “सगळं ठीक आहे ना?” तसंच “मस्त”, “वेडी झाली की काय?”, “जबरदस्त”, “सुपर”, “थोडा वेडेपणा गरजेचा आहे”, “हास्यास्पद आहे”, “हे काय आहे?” अशाप्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: “अब भौकाल भी बडा होगा और पडदा भी”, ओटीटीनंतर मोठा पडदा गाजवणार ‘मिर्झापूर’ चित्रपट, लवकरच होणार प्रदर्शित

दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या ( Shilpa Shetty ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘केडी-द डेविल’मध्ये सत्यवती अग्रिहोत्री म्हणून पाहायला मिळणार आहे. या अ‍ॅक्शन, थ्रिलर कन्नड चित्रपटात शिल्पा शेट्टीसह ध्रुव सरजा, रेशमा नानाया, वी रविचंद्रन, रमेश अरविंद, जीशु सेनगुप्ता, नोरा फतेही आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader