अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘तू झुठी में मक्कार’ चित्रपटापासून चांगलीच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धाला ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाचा निरागसपणा, नम्रपणा नेटकऱ्यांना भावतो. अलीकडेच एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर श्रद्धाने पापाराझींशी मराठीमध्ये संवाद साधत त्यांना काही मजेशीर प्रश्न विचारले सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : दीपिका पदुकोणने पतीला केले ट्रोल; इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहसाठी शेअर केला भन्नाट मीम
‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मराठीतून संवाद साधतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत श्रद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीला पाहून पापाराझींनी गर्दी केली होते. तेव्हा श्रद्धा त्यांना म्हणाली, “तुम्हाला कसं कळालं मी इथे आहे?” तेव्हा तिला एका पापाराझी फोटोग्राफरकडून, “तुमची गाडी पाहून आम्हाला कळाले, तुम्हाला आतमध्ये जातानाही आम्ही पाहिले होते” असे उत्तर देण्यात आले.
हेही वाचा : “सेटवर अभिनेत्याला मारहाण…” ‘तारक मेहता’मधील ‘बावरी’चा धक्कादायक खुलासा, म्हणाली “तो अतिशय घाणेरडा…”
श्रद्धा कपूर पुढे म्हणाली, “तुम्हाला सगळ्यांचे नंबर माहिती आहे, माझ्या तर सगळ्या गाड्यांचे नंबर तुम्ही लक्षात ठेवले आहेत…” यावर “हो…तुमच्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ आहेत” असे उत्तर पापाराझींनी दिले. सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि पापाराझींमधील या मराठी संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रद्धाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. “इतर सेलिब्रिटीप्रमाणे गोंधळ न घालता श्रद्धाने पापाराझींबरोबर अतिशय नम्रपणाने संवाद साधला” अशा कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.