संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या देखील घरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अंबानी यांच्या घराच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी काल सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अँटिलियावर पोहोचले होते. बॉलीवूड ते टॉलीवूडपर्यंतचे लोकप्रिय सेलिब्रिटी यावेळी पाहायला मिळाले. यादरम्यानचा अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

‘फिल्मी ग्नान’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्रामवर पेजवर श्रद्धा कपूर आणि रश्मिकाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, रश्मिका पापाराझींना फोटो देण्यासाठी उभी असते. पण तितक्यात मागून श्रद्धा कपूर येते. त्यामुळे रश्मिका श्रद्धाकडे बघून हसते. मात्र श्रद्धाच लक्ष नसतं ती निघून जाते. पुन्हा रश्मिका श्रद्धाकडे बघून गोड हसताना दिसते. हाच व्हिडीओ पाहून नेटकरी श्रद्धाने रश्मिकाला दुर्लक्ष केल्याचं म्हणतं आहेत.

हेही वाचा – “खूप धाडस करुन हे पाऊल उचलते…” ‘ रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचं नव्या क्षेत्रात पदार्पण

हेही वाचा – ‘आरआरआर’नंतर एसएस राजामौली यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकची केली घोषणा; काय असणार चित्रपटाचं नाव?

एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “बॉलीवूडमधील लोकांचा जास्त अहंकार आहे. त्यामुळे आजकाल लोक दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर जास्त प्रेम करत आहेत. बॉलीवूडमधील लोकांना एकमेकांची पोलखोल करण्यात जास्त रस आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “श्रद्धाने ज्याप्रकारे रश्मिकाला दुर्लक्ष केलं ते म्हणजे एकप्रकारे नेपोटिझम आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “या श्रद्धा कपूरमध्ये एवढा अहंकार कसला आहे?”

दरम्यान, दोघींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, श्रद्धा आगामी ‘स्त्री २’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २०२४ला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर रश्मिका लवकरच अभिनेता रणबीर कपूरबरोबर ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपट पाहायला मिळणार आहे.

Story img Loader