रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या फ्रेश जोडीचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अखेर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. चित्रपट बॉक्स ऑफिसवरदेखील दमदार कमाई करत आहे. या चित्रपटात श्राद्धाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे, या चित्रपटातील नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले आहे मात्र नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यात श्रद्धाने बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. मैने पी रखी है, असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्यात रणबीर कपूरदेखील दिसत आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

Photos :…अन् शिक्षकाने मला पकडलं; श्रद्धा कपूरने सांगितला शालेय जीवनातला ‘तो’ किस्सा

श्रद्धाने इन्स्टाग्राम अकाउंटवर गाणे शेअर करताच तिला ट्रोल केले जात आहे. एकाने लिहले आहे “किती खराब गाणे आहे” तर दुसऱ्याने लिहले आहे, “मी डिसलाइकचे बटन दाबत आहे” तर तिसऱ्याने लिहले आहे, “गाण्यामध्ये काहीही शब्द वापरले आहेत.” “या चित्रपटामधील आणखीन किती खराब गाणी येणार आहेत” असेही एकाने लिहले आहे. काहींनी तिच्या लूकवर कमेंट केली आहे. “तिला पारंपरिक कपडे चांगले वाटतात” असे एकाचे म्हणणे आहे.

दरम्यान ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.