Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding: २०१० मध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी रज्जो म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर सोनाक्षीनं काल, २३ जूनला नोंदणी पद्धतीनं लग्न केलं आहे. दोन्ही कुटुंबियांच्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नात सोनाक्षी सिन्हा भावुक झाल्याचं पाहायला मिळाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा होती. सोनाक्षीचं लग्न कोणत्या पद्धतीनं होणार? कसं होणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अखेर काल सोनाक्षीनं झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं आहे. शुक्रवारपासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी मेहंदी समारंभ झाला. त्यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर खास पूजा ठेवली होती आणि काल दोघं लग्नबंधनात अडकले.

हेही वाचा – Video: लग्नात सोनाक्षी सिन्हाने राहत फतेह अली खानच्या गाण्यावर ‘अशी’ केली जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

लग्नात सोनाक्षीनं खास तिच्या आईची (पूनम सिन्हा) ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नात झहीरची बहीण जन्नत वासी लोखंडवालाने दोघांची नजर काढली. यावेळी सोनाक्षी नणंदेला मिठी मारून भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. जन्नत वासी लोखंडवालाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिनं लिहिलं आहे, “माझ्या भावाचं लग्न झालं. अभिनंदन पा आणि सोना.”

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकरांबरोबर ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Sonakshi-Sinha.mp4

हेही वाचा – विजय मल्ल्याच्या लेकानं ख्रिश्चन पद्धतीनं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिला फोटो आला समोर

दरम्यान, सोनाक्षीनं सर्वात आधी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करत तिनं लिहिलं, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही नवरा आणि बायको झालो आहोत…सोनाक्षी आणि झहीर…२३.०६.२०२४”