सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे दोघंही विवाह बंधनात अडकणार आहेत. सोनाक्षी आणि झहीर यांचं लग्न हिंदू पद्धतीनेही होणार नाही आणि मुस्लीम पद्धतीनेही होणार नाही. तर नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडणार आहे. झहीर इकबालच्या घरीच हे लग्न पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. सुरुवातीला या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा हजर राहणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र तसं काहीही होणार नाही. अशात आता सोनाक्षीच्या वेडिंग ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

पापाराझी विरेंद्र चावला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक माणूस कारमधून एक सुंदर कलाकुसर असलेला ड्रेस कारमधून बाहेर काढताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत विरेंद्र चावलांनी हे म्हटलं आहे की हा सोनाक्षीचा वेडिंग ड्रेस आहे.

हे पण वाचा- “हिंदू धर्मात देवाला…”, सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासऱ्यांचं वक्तव्य चर्चेत

सोनाक्षीचा वेडिंग ड्रेस कसा आहे?

या व्हिडीओत दिसतं आहे त्याप्रमाणे सोनाक्षी लग्नात पेस्टल पिंक रंगाचा ड्रेस घालणार आहे. या ड्रेसच्या लेहंग्यावर चंदेरी वर्क करण्यात आलं आहे. या ड्रेससह सोनाक्षी कोणते दागिने मॅच करणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. सोनाक्षी आणि झहीर या दोघांचा लग्नानंतरचा लूक कसा असेल हे पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. अशात या वेडिंग ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोनाक्षी व झहीर विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार लग्न करतील. झहीरचे वडील म्हणाले की २३ जून रोजी हे लग्न वांद्रे येथील कार्टर रोडवरील त्यांच्या घरी होईल. विशेष विवाह कायद्यांतर्गत, जोडप्याने निवडलेल्या ठिकाणी लग्नाच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रार येईल व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल.

सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम स्वीकारणार का?

सोनाक्षी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार अशा चर्चा होत आहेत, त्याबाबत इक्बाल रत्नासी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. “ती धर्मांतर करणार नाही. इथे दोन मनं एकत्र येत आहेत, त्यामुळे यात धर्म हा विषय नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम धर्मीय अल्लाह म्हणतात. पण सरतेशेवटी आपण सर्वजण माणूस आहोत. माझे आशीर्वाद नेहमी झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत,” असं इक्बाल रत्नासी म्हणाले.