अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने ९० च्या दशकात बॉलीवूड गाजवलं होतं. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘कभी हां कभी ना’मध्ये तिने भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे ती घराघरांत पोहोचलेली सुचित्रा आता चित्रपटांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एकदा तिने न्यूज बर्लिनमध्ये नेकेड पार्टीत सहभागी झाल्याचं सांगितलं होतं. नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात.

सुचित्राने एकदा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. “मी बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्हिटी/नेकेड पार्टीमध्ये सहभागी झाले. पण तिथे मला ‘इतकेही मोकळ्या विचारांचे होऊ नका की तुमचं डोकं खराब होईल’ ही म्हण आठवली. मी नेहमीच एस देसी मुलगी राहीन. आता आंघोळ करून गायत्री मंत्राचा जप करावा असं वाटतंय. बाप रे,” असं सुचित्राने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

इतकंच नाही तर सुचित्रा कृष्णमूर्तीने या न्यूड पार्टीत जाण्याचा अनुभव ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना सविस्तर सांगितला होता. एका मित्राच्या माध्यमातून सुचित्रा या पार्टीत पोहोचली होती. शरीराबद्दल सकारात्मकता वाढवणे आणि शरीराबद्दलचे न्यूनगंड दूर करणे हा होता, असा या पार्टीमागचा उद्देश होता. या पार्टीत अनुभव घेण्यासाठी आनंदाने सुचित्रा तिथे गेली, पण तिथली दृश्ये पाहून तिला धक्का बसला.

मी तिथून पळून आले- सुचित्रा कृष्णमूर्ती

सुचित्रा म्हणाली, “या गोष्टी इथे खूप सामान्य आहेत. एका पबमध्ये ही पार्टी सुरू होती. हा पब माझ्या मित्राच्या मित्राचा होता. या पबमधील पाहुण्यांच्या यादीत माझंही नाव होतं. मी तिथे गेले पण आतमध्ये पोहोचताच तिथले दृश्य पाहून मला धक्का बसला आणि मी २० मिनिटांत तिथून पळ काढला. कारण मी एक साधी मुलगी आहे आणि मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट्स बघायचे नव्हते.”

रात्रभर सुरू होती पार्टी

“पण ही पार्टी चांगल्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. ही मजेदार आणि सकारात्मक गोष्ट आहे. तिथे अजिबात अश्लीलता नव्हती. पण भारतीय म्हणून आपण आपल्या शरीराविषयी जागरूक राहण्यास शिकवलं जातं,” असं सुचित्रा कृष्णमूर्तीने सांगितलं होतं. ती या पार्टीमध्ये २० मिनिटं थांबली आणि मग निघून आली, पण ती पार्टी रात्रभर सुरू होती, असं तिने सांगितलं होतं.