बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यात, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सुश्मिताने स्वत: याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली होती. हळू हळू सुश्मिता आजारातून बरी होत आहे. सुष्मिता नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तब्येतीची माहिती देत असते. आपल्या अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल सुश्मिताने एसुश्मिता क पोस्ट शेअर केली आहे.
सुश्मिताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे. अँजिओप्लास्टीला झालेला एक महिना साजरा करत आहे. आणि जी गोष्ट मला सगळ्यात जास्त करायला आवडते ती करत आहे ते म्हणजे काम. सुश्मिताच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहतेही त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. लोक तिच्या धाडसाचे प्रचंड कौतुक करत आहेत. लोकांनी तिला हिंम्मवाली म्हणत आहेत.
सुश्मिता सेनला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्या मुख्य धमनीत ९५ टक्के ब्लॉकेज होते. त्यामुळे तिच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागली. या अँजिओप्लास्टीला आता एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त सुश्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर हसताना दिसत आहे.