बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर राहून आपल्या लेकीबरोबर वेळ घालवत आहे. असं असलं तरी अभिनेत्री सोशल मीडियावर फार सक्रिय असते. लेकीबरोबरचे खास क्षण चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतीच स्वराने एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे. हेही वाचा -‘नियम व अटी लागू’ नाटक पाहून संजय मोनेंनी अमृता देशमुखची ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी केली होती तुलना, म्हणाले “रंगमंचावर…” अभिनेत्री स्वरा भास्करने लेकीसह एक फोटो शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये स्वराने लिहीलंय, "कोणत्याही नव्या आईला माहिती असेल की, ती तिच्या नवजात बाळाकडे शांत आणि आनंदाच्या भावनेने तासनतास एकटक पाहू शकते. यात मी काही वेगळी नाही आणि मला खात्री आहे की जगातल्या अनेक मातांप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या बाळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला जाणवणारी भावना आता सतत भीतीदायक विचारांनी व्यापलेली आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणे कठीण झालं आहे." हेही वाचा – क्रांती रेडकरने शेअर केला लेकींच्या गरबा डान्सचा व्हिडीओ, म्हणाली… "मी माझ्या मुलीच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहते आणि विचार करते की, जर तिचा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी तिचं संरक्षण कसं केलं असतं? अशा परिस्थितीत ती कधीच अडकू नये ही प्रार्थना करते आणि मग ती कोणत्या आशीर्वादाने जन्माला आली याचा विचार करत होते. याबरोबरच गाझाची मुलं कोणता शाप घेऊन जन्माला आली असतील, ज्यांना रोज बंदिवासाच्या आभाळाखाली मारले जात आहे. त्यामुळे कोणत्या तरी अशा ईश्वराकडे प्रार्थना करेल जो ऐकले, गाझाच्या मुलांना दु:ख, वेदना आणि मृत्यूपासून वाचवा. कारण जग त्यांचे रक्षण करणार नाही," अशी भावनिक पोस्ट स्वरा भास्करने लिहिली आहे. हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री; झळकला महत्त्वाच्या भूमिकेत हेही वाचा – Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत दरम्यान, स्वराने २३ सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी तिनं सोशल मीडियाद्वारे दिली. स्वरा आणि पती फहद अहमद यांनी आपल्या मुलीचं नाव राबिया ठेवलं आहे. हे एका महिला सुफी संताचे नाव आहे.