scorecardresearch

“त्यांनी सर्वांसमोर माझा…” तापसी पन्नूने सांगितला ‘मिस इंडिया’ स्पर्धेदरम्यान तिला आलेला कटू अनुभव

२००८ साली ती या स्पर्धेत सहभागी झाली होती.

taapsee pannu

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. आता तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेदरम्यान तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.तापसीने नुकतीच ‘लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मिस इंडिया स्पर्धेदरम्यान तिला आलेला अनुभव सांगितला आहे. २००८ साली ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. पण तिला यादरम्यान अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं.

तापसी म्हणाली, “ही गोष्ट २००८ ची आहे. तेव्हा मी विद्यार्थी होते. मी चांगले मार्क मिळवत राहील या अटीवर मी माझ्या आई वडिलांना मला या स्पर्धेत सहभागी होऊ देण्यासाठी राजी केलं. मला अजिबात अंदाज नव्हता की या स्पर्धेसाठी काय काय सुरू होतं. मला सत्य विचारू नका, खोटं मी बोलू शकत नाही आणि सत्य कदाचित मी सांगू शकणार नाही. पण मी काय करू शकते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवू शकते.”

आणखी वाचा : “आता मी स्वतः…” न्यासाला ट्रोल केलं जाण्यावर अजय देवगणची स्पष्ट प्रतिक्रिया

पुढे ती म्हणाली, “माझी जेव्हा या स्पर्धेसाठी त्यासाठी निवड झाली तेव्हा माझा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मला या गोष्टीची खात्री होती की मी टॉप १० मध्ये पोहोचल्यावर या स्पर्धेतून मला बाहेर काढला जाईल. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशातून २८ आणि दिल्लीतून दोन-तीन मुली निवडल्या गेल्या होत्या, ज्यातील एक मी होते. माझ्याबरोबर बाकी सगळ्या प्रोफेशनल मॉडेल होत्या. त्यावेळी मी फक्त फोटोशूट केलं होतं. मी कुठलीही जाहिरात केली नव्हती किंवा कधीही रॅम्पवॉकही केला नव्हता. याचं कारण म्हणजे ते सगळे शो रात्री होतात आणि माझे बाबा मला रात्रीचे जाऊ द्यायचे नाहीत.”

हेही वाचा : पहिल्याच दिवशी तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ चित्रपटाचे शो रद्द, कारण…

याच दरम्यान तिला आलेले कटू अनुभवही तिने सांगितले. ती म्हणाली, “मिस इंडिया ट्रायल्सच्या वेळी सर्वांसमोर मला टोचून बोलण्यात आलं होतं. आमच्या ग्रुमिंग पिरिएड दरम्यान आम्हाला चालायला शिकवलं जायचं आणि हसायलाही शिकवलं जायचं. तेव्हा हेमंत त्रिवेदी आमचे मार्गदर्शक होते. तेव्हा ते सर्वांसमोर माझा अपमान करायचे. जर ही स्पर्धा माझ्या हातात असती तर तुला टॉप २८ पर्यंतही पोहोचू शकली नसतीस असं ते मला म्हणायचे.” आता तापसीचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. त्याचबरोबर तिने सांगितलेल्या या अनुभवावर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:45 IST
ताज्या बातम्या