बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तब्बू. गेले अनेक दिवस ती तिच्या ‘भोला’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तब्बू आणि अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अशातच तब्बूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने केलेल्या कृतीमुळे नेटकरी तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
गेले काही दिवस तब्बू आणि अजय देवगण त्यांच्या ‘भोला’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये विविध शहरांमध्ये हजेरी लावून ते त्यांच्या चित्रपटाचा प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. पण या दरम्यान चाहतीच्या एका कृतीमुळे तब्बू काहीशी नाराज झालेली दिसली आणि तिने जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे ती ट्रोल होत आहे.
तब्बू आणि अजय देवगण दिल्लीच्या पॅसिफिक मॉलमध्ये पोहोचले होते. यावेळी तब्बू आणि अजयने प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि नंतर काहींनी फोटो सेशनही केलं. दरम्यान, एक लहान मुलगी जिने पहिल्यांदा अजयला मिठी मारून फोटो काढले. त्यानेही कोणतीही चिडचिड न करता मोठ्या प्रेमाने पोज दिली. तर त्यानंतर ती तब्बूकडे गेली. त्या मुलीला तब्बू बरोबर मिठी मारलेला फोटो काढायचा होता. पण तिने तसा प्रयत्न करताच तब्बू मागे झाली आणि तिचा हात पकडून तो बाजूला करायला सांगितला. त्यानंतर त्या मुलीने काही अंतर लांब राहून तब्बूबरोबर फोटो काढला.
पण हा व्हिडिओ समोर येताच नेतकऱ्यांनी तब्बूने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे त्या ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अजय देवगणबरोबरही तिने मिठी मारून फोटो काढला. त्याने काही हरकत घेतली नाही. मग तू का अशी वागलीस?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तू खूप उद्धट वागलीस. पैसा आल्यावर लोक स्वतःला काय समजू लागतात काय माहित.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “ती छोटी मुलगी आहे. उत्साहाच्या भरात तिला कळलं नाही. पण तू तिच्याशी असं वागायला नको होतंस.” आता या व्हायरल व्हिडिओमुळे तब्बू खूप चर्चेत आली आहे.