बॉलिवूडमध्ये पडदयावर जशी अभिनेते अभिनेत्रींची जोडी हिट ठरते त्याचपद्धतीने खऱ्या आयुष्यातदेखील या जोड्या हिट ठरतात. सैफ करीना, रितेश जिनिलिया या जोडयांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या जोड्या कायमच चर्चेत असतात. सध्या बॉलिवूडमध्ये एकाच जोडीची चर्चा आहे ती जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणी, ‘शेरशहा’ चित्रपटात ही जोडी आपल्याला पहिल्यांदा दिसली होती. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याची सोशल मीडियावर सातत्याने चर्चा आहे. दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ कियारा नुकतेच दोघे एकत्र एका पार्टीत दिसले. अश्विनी यार्दी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत ते दोघे एकत्र येताना दिसले. पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे नेटकऱ्यांनी कॉमेटन्सचा वर्षाव केला आहे. कियाराने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये त्यांच्या या नात्याबाबत बरेच खुलासे केले. सिद्धार्थ मल्होत्रा आपल्यासाठी बेस्ट फ्रेंडपेक्षा जास्त काहीतरी आहे अशी कबुली कियाराने या शोमध्ये दिली होती.

कंगना राजकारणात येणार? हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

याच शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रादेखील येऊन गेला होता. तेव्हा त्याला कियाराबरोबर लग्नाचा काही प्लॅन असा करण जोहरने विचारला तेव्हा तो म्हणाला ‘मी आनंदी आणि उज्ज्वल भविष्याची घोषणा करतो.’ असे उत्तर दिले होते. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या आधीपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. या दोघांची पहिली भेट करण जोहरच्या एका पार्टीमध्ये झाली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये या भेटीबद्दल स्वतः करण जोहरनेच सांगितलं आहे. बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ लग्नाबद्दल असं म्हणाला की ‘आता काहीच गुपित राहिलेले नाही. लग्नाबद्दल मी माझे कॅलेंडर एकदा बघतो आणि वेळ आली की माहिती देतो’.

कामाच्या बाबतीत दोघे चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. ‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका सैनिकाचे पात्र साकारणार आहे. करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकावर आहे.

Story img Loader