Jalaj Dhir Died Car Accident : दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा १८ वर्षीय मुलगा, जलज धीरचं २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईच्या विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका कार अपघातात निधन झाले. अहवालानुसार, जलजने आपल्या गोरेगाव येथील घरी मित्रांना व्हिडीओ गेम खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. नंतर तो आणि त्याचे तीन मित्र साहिल मेंधा (१८), सार्थ कौशिक (१८) आणि जेडन जिमी (१८) ड्राईव्हसाठी बाहेर गेले. त्यानंतर ते एका रेस्टॉरंटमध्ये थांबले. तिथून परतताना हा अपघात घडला.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार जलजचा मित्र साहिल मेंधा गाडी चालवत होता, त्याने मद्यप्राशन केले होते असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. साहिल अपघाताच्या आधी भरधाव वेगाने कार चालवत होता. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलजवळ आल्यानंतर, गोरेगावला जाण्यासाठी फ्लायओव्हरने जायचे की सर्व्हिस रोडने याबाबत साहिल गोंधळला. या गोंधळात त्याने आधी डावीकडे वळण घेतले आणि नंतर उजवीकडे जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट दुभाजकाच्या पोलवर जाऊन आदळली. या अपघाताचा तपशील जलजचा मित्र जेडनने पोलिस तक्रारीत नमूद केला आहे.

Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
Chhatrapati sambhajinagar loksatta news
छत्रपती संभाजीनगर : प्रेमप्रकरणातून बहिणीला डोंगरावरून ढकलले; तरुणीचा मृत्यू
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय

हेही वाचा…इरफान खानच्या निधनाचं दु:ख आजही कायम, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण; म्हणाला, “तो मानसिकरित्या…”

गोव्यात IFFI ला जाणार होता जलज

जलज धीर बीबीएचा विद्यार्थी होता आणि तो त्याच्या वडिलांबरोबर गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये सहभागी होणार होता. अश्विनी धीर यांचा नवीन चित्रपट ‘हिसाब बराबर’चा प्रीमियर या फेस्टिव्हलमध्ये होणार होता, मात्र त्याआधी जलजचा दुर्दैवी अपघात घडला. जलजवर २४ नोव्हेंबर २०२४ रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. काल जलजच्या निधनाची प्रार्थना सभा पार पडली. या प्रार्थना सभेला निर्माता जेडी मजेठिया, अभिनेते राजेश कुमार यांसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.

हेही वाचा…अभिषेक बच्चन बॉलीवूडमधून घेणार होता कायमची निवृत्ती; बिग बींच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदलला निर्णय; म्हणाला…

अश्विनी धीर यांची कामगिरी

अश्विनी धीर हे बॉलीवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘वन टू थ्री’ (२००८), ‘अतिथी तुम कब जाओगे’ (२०१०), ‘सन ऑफ सरदार’ (२०१२) आणि ‘गेस्ट इन लंडन’ (२०१७) यांसारखे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. याशिवाय, ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या टीव्ही मालिकेचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader