scorecardresearch

‘बॉयकॉट बॉलिवूड’वर दिग्दर्शक मधुर भांडारकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले “सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर…”

दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात.

madhur bhandarkar
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

गेल्या वर्षी पासून बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड खूप चर्चेत आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुख खानच्या पठाणलादेखील बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसून आली मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. २०२२ वर्षात बॉलिवूडचे चित्रपट फारसे चालेले नाहीत. बॉयकॉट बॉलिवूड, वेगवेगळे वाद यावरच प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी भाष्य केलं आहे

दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात. नुकताच त्यांचा इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून ते करोना काळातील टाळेबंदीवर भाष्य केलं आहे. नुकतेच ते एबीपी माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. तेव्हा त्यांनी बॉलिवूडबद्दल भाष्य केले. ते असं म्हणाले, “मला असं वाटते हा एक टप्पा आहे आणि हा टप्पा ४ ते ५ वर्षांनी येतो. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर हा टप्पा आला आहे असं वाटतं. लोकांमध्ये याबद्दल प्रचंड कुतुहल होतं की नेमकं काय घडलं माझ्या मते त्यानंतर बॉयकॉट प्रकार वाढला आहे.”

मी गरोदर असताना गे व्यक्तीबरोबर…” नीना गुप्तांनी सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग

ते पुढे म्हणाले, “दीड वर्षांमध्ये म्हणजे करोना महामारीनंतर प्रेक्षक वर्ग ओटीटीकडे वळले आहेत. आज जगभरातील कन्टेन्ट ओटीटीवर पाहायला मिळतो. जिथे इटालियन चित्रपट स्पॅनिश चित्रपट असे चित्रपट प्रेक्षक बघू लागलेत. एखादा चित्रपट आला तरच लोक चित्रपटगृहात जातील. २०२२ वर्ष हे बॉलिवूडसाठी खूप वाईट होते. खूप नुकसान झाले.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“काम देण्याच्या मोबदल्यात त्यांनी माझ्याकडे…” कास्टिंग काऊचबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

मधुर भांडारकर यांनी ‘पेज ३’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘चाँदनी बार’, ‘फॅशन’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या आगामी ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कोविड काळात देशातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, शिवाय या काळात सामान्य माणूस कशा रितीने भरडला गेला यावर मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रकाश टाकला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 11:47 IST