प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली 'आदिपुरुष'बद्दल भविष्यवाणी; म्हणाले "हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर..." | bollywood director milap milan zaveri express his thoughts about prabhas starrer adipurush teaser | Loksatta

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…”

प्रभास आणि सैफ अली खान यांच्या लूकवरूनही चांगलाच वाद रंगला आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने केली ‘आदिपुरुष’बद्दल भविष्यवाणी; म्हणाले “हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर…”
आदिपुरुष चित्रपट | adipurush film

नुकताच अयोध्या येथे प्रभास आणि क्रीती सनोन यांच्या बहुचर्चित आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर या चित्रपटाच्या टीझरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. प्रभास आणि सैफ अली खान यांच्या लूकवरूनही चांगलाच वाद रंगला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी केले आहेत. पण बॉलिवूडकरांपैकी फार कमी लोक यावर भाष्य करत आहेत.

दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी याबद्दल नुकतंच भाष्य केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मिलाप यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, “आदिपुरुषच्या टीझरमधील शेवटचं दृश्यं बघून माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. माझं ही ट्वीट लक्षात ठेवा, हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार आहे. माझ्या ७ वर्षाच्या मुलालाही हा टीझर प्रचंड आवडला असून तो या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.”

असं ट्वीट करत मिलाप यांनी दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार, प्रभास या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच एका ट्विटर यूझरच्या ट्वीटला उत्तर देत मिलाप यांनी या चित्रपटाची आणखीन प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, “सर्व वयोगटातील प्रेक्षक या चित्रपटासाठी गर्दी करेल. दिग्दर्शकाचे आणि या सर्व कलाकारांचे ध्येय हे फार अनोखं आहे. नक्कीच हा चित्रपट इतिहास रचेल, यात काहीच शंका नाही.”

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून प्रेक्षकांनी मानले ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकाचे आभार; म्हणाले “अयान मुखर्जी तुला…”

‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर बेतलेला असून या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी असल्याची चर्चा बाहेर चांगलीच रंगली आहे. सोशल मीडियावर सगळेच या चित्रपटाची एवढी आलोचना करत असताना एका बॉलिवूड दिग्दर्शकाचं ही वक्तव्यं लोकांना बुचकळ्यात टाकणारं आहे. १२ जानेवारी २०२३ या दिवशी हा चित्रपत्र ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गरोदर असताना हाय हिल्स घातले म्हणून आलिया पाठोपाठ बिपाशाही ट्रोल

संबंधित बातम्या

“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप
एकता कपूर आणि दिशा पटानी यांच्यात मतभेद; शूटिंग अर्धवट सोडून अभिनेत्रीची चित्रपटातून एग्झिट, कारण…
पुरस्कार सोहळ्यात भाषण देत होती आलिया भट्ट, बाळाने पोटात पाय मारला अन्…
Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…
Video: सपना चौधरीची यंदाची दिवाळी भारतीय सैन्यातील जवानांबरोबर, सर्वत्र होतोय कौतुकाचा वर्षाव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी
छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई