Bollywood Movies May 2026 releases: प्रेक्षक नेहमीच विविध प्रकारचा कंटेट पाहण्यासाठी उत्सुक असतात, त्यामुळे दर आठवड्याला ओटीटीवर काय प्रदर्शित होणार, तसेच कोणते नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुक असतात. आता मे महिन्यात बॉलीवूडचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता हे सिनेमे कोणते, कोणत्या सिनेमात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत आणि हे सिनेमे कधी प्रदर्शित होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
है जवानी तो इश्क होना है
“है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटात वरुण धवन प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. वरुण धवनबरोबर या सिनेमात अभिनेत्री मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा टीझर पाहायला मिळाला होता. हा सिनेमा २२ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
आखरी सवाल
‘आखरी सवाल’ या सिनेमात संजय दत्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ८ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
चांद मेरा दिल
‘चांद मेरा दिल’ या सिनेमात अनन्या पांडे आणि लक्ष्य लालवानी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा एक रोमँटिक सिनेमा आहे. यामध्ये लक्ष्य व अनन्या यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असून सिनेमा २२ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
राजा शिवाजी
गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या सिनेमात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासह या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. महेश मांजरेकर, जिनिलीया देशमुख, विद्या बालन, भाग्यश्री, संजय दत्त, अभिषेक बच्चन असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
एक दिन
‘एक दिन’ हा सिनेमा १ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आमिर खानचा मुलगा जुनैद खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर साई पल्लवी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
याबरोबरच नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, कपिल शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दादी की शादी’ हा सिनेमा ८ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि सारा अली खान यांचा ‘पती पत्नी और वो दो’ हा सिनेमा १५ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
