scorecardresearch

Premium

Video: मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाने शाहरुख खानला अडवलं अन् मग…; बादशाहच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष

बॉलीवूडच्या किंग खानबरोबर मुंबई विमानतळावर नक्की काय घडलं? पाहा…

bollywood popular actor Shah Rukh Khan patiently waits for police verification at Mumbai airport video goes viral
बॉलीवूडच्या किंग खानबरोबर मुंबई विमानतळावर नक्की काय घडलं? पाहा…

‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट सज्ज झाला आहे. शाहरुखचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या किंग खान चांगलाच चर्चेत आहे. अशातच शाहरुखचा मुंबई विमानतळावर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख काळ्या रंगांच्या कपड्यात दिसत आहे. यावेळी सुरक्षा रक्षक शाहरुख खानला पासपोर्ट आणि इतर कागदपत्र पडताळणीसाठी अडवतो. त्यानंतर शाहरुख विनम्रतेने पासपोर्टसह इतर कागदपत्र सुरक्षा रक्षकाला हसत-हसत दाखवतो. किंग खानच्या याच विनम्र स्वभावाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे. मुंबई विमानतळावरील शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

nagpur airport gold smuggling marathi news, gold smuggling nagpur airport marathi news
पँट, बनियानमध्ये लपवून सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर शारजाहून आलेल्या प्रवाशाला अटक
indigo pilot passengers extend warm welcome to nitin gadkari on nagpur delhi flight video viral
“आम्हाला तुमचा अभिमान” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे विमानात विशेष स्वागत, प्रवाशांकडून टाळ्यांचा कडकडाट; पाहा VIDEO
new terminal at Pune Airport
पुणे विमानतळासाठी तारीख पे तारीख! पंतप्रधानांना वेळ नसल्याने नवीन टर्मिनलचे ‘उड्डाण’ होईना
Navy Veterans
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपामुळे…”, भारतात परतलेल्या माजी नौसैनिकांची पहिली प्रतिक्रिया, विमानतळावरच केला हर्षोल्लास!

हेही वाचा – “पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”, नीना गुप्ता यांच्या ‘फालतू फेमिनिझम’ विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

शाहरुखच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले आहे. ‘यशाची व्याख्या शाहरुख खान आहे’, ‘बॉलीवूडचा किंग’, ‘खरा डॉन’, ‘प्रोटोकॉलचा सन्मान करणारा आणि कधीच नियम न तोडणारा किंग खान आहे’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘अवतार ३’कधी येणार? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा मुलाखतीदरम्यान खुलासा

दरम्यान, शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटातील ‘लुट पुट गया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्यावरील रील्स चांगलेच व्हायरल होतं आहेत. ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विक्की कौशल पाहायला मिळणार आहे. ‘हा चित्रपट अवैध स्थलांतर या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood popular actor shah rukh khan patiently waits for police verification at mumbai airport video goes viral pps

First published on: 01-12-2023 at 10:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×