जुही चावलाने १९८६ला ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला कयामत से कयामत तक या चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
‘शानदार’, ‘स्वर्ग’, ‘बेनाम बादशाह’, ‘कर्ज’, ‘बोल राधा बोल’, तुम मेरे हो, लुटेरे, शतरंज, राम जाने, बंदिश, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, इश्क अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने मनोरंजन केले.
जुही चावला २०२५ मध्ये सर्वात श्रीमंत बॉलीवूड अभिनेत्री ठरली. २०२५ मधील हुरुन रिच इंडिया लिस्टनुसार अभिनेत्री जुही चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने हृतिक रोशन, करण जोहर आणि बच्चन कुटुंबाला मागे टाकले. विशेष म्हणजे सध्या ती पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करत नाही.
जुही चावलाची संपत्ती किती?
जुही चावला व तिचे पती जय मेहता यांचे विविध उद्योग व्यवसायाचा या संपत्तीमध्ये मोठा वाटा आहे. रेड चिलीज ग्रुपमध्ये शाहरुख खान आणि जुही चावला व्यावसायिक भागीदार आहेत. त्याबरोबरच आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमचेदेखील शाहरुख खान, जुही चावला व तिचा पती जय मेहता हे भागीदार आहेत. अभिनेत्री ७७९० कोटींची मालकीण आहे.
गेल्या १३ वर्षांत जुही चावलाचा एकही चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला नाही. २००९ मध्ये लक बाय चान्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र, त्यानंतर या अभिनेत्रीने व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. एकेकाळी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या, सध्या बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत असलेल्या अभिनेत्रीचे शिक्षण किती, हे तुम्हाला माहित आहे का?
जुही चावलाचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. तिने मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेस आहे. तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. जूहीचे वडील भारतीय महसूल सेवेत (Indian Revenue Service) अधिकारी होते. जुही १९८४ मध्ये मिस इंडिया हा किताब जिंकला होता.
जुही सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती विविध फोटो शेअर करत असते तिचे विविध लूकमधील फोटो लक्ष वेधून घेतात. अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे.
दरम्यान, जुही चावला आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

