scorecardresearch

शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…

सौदी अरेबियामध्ये रेड सी चित्रपट महोत्सवात हा प्रसंग घडला.

शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचे चाहते देशभरातच नव्हे तर जगभरात आहेत. जितकी त्याची लोकप्रियता देशात आहे तितकीच परदेशात ही आहे. शाहरुख खानची दखल केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलीवूडनेदेखील घेतली आहे. असं जरी असलं तरी एका अभिनेत्रीने चक्क शाहरुख खान बाजूला असतानादेखील त्याला ओळखले नाही.

शाहरुख खानची लोकप्रियता अनेकवर्षांपासून आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी चाहते देशभरातून येत असतात. मात्र एका अभिनेत्रीने त्याला ओळखले नाही झालं असं सध्या शाहरुख आखाती देशांमध्ये आहे. सौदी अरेबियामध्ये ‘रेड सी’ चित्रपट महोत्सवात हा प्रसंग घडला. या महोत्सवात हॉलिवूडचे कलाकार उपस्थित होते. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

या कार्यक्रमात निविदिकने शाहरुख खानचे नाव पुकारले, शाहरुख आपल्या जागेवरून उठला आणि त्याने सगळ्यांना अभिवादन केले. शाहरुख खानच्या बाजूला बसलेली हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन आश्चर्यचकित झाली. तिला कल्पना नव्हती शाहरुख खान तिच्या बाजूला बसला आहे. शाहरुख खानचे नाव घेताच तिने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, शाहरुख खान सगळ्यांचा आदर करतो. तर दुसऱ्याने लिहले आहे कदाचित तिला ओळखता आले नसेल, अनेकांनी शाहरुख खानचे कौतुक केले आहे

‘रेड सी’ चित्रपट महोत्सवात शाहरुख खानला भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. तसेच तो ‘जवान’, ‘डंकी’ या दोन चित्रपटांवर काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:23 IST

संबंधित बातम्या