scorecardresearch

आतिफ अस्लमला कन्यारत्न, रमजानच्या मुहूर्तावर शेअर केला पहिला फोटो, लेकीचं नाव ठेवलं…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आतिफला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. आतिफची पत्नी साराने २३ मार्चला गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरुन आतिफने बाबा झाल्याची गुडन्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे. आतिफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लाडक्या लेकीचा पहिला फोटो शेअर केला आहे. आतिफ व साराने ‘हलिमा’ असं त्यांच्या गोंडस लेकीचं […]

atif aslam blessed with baby girl
आतिफ अस्लमला कन्यारत्न. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आतिफला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. आतिफची पत्नी साराने २३ मार्चला गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरुन आतिफने बाबा झाल्याची गुडन्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

आतिफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लाडक्या लेकीचा पहिला फोटो शेअर केला आहे. आतिफ व साराने ‘हलिमा’ असं त्यांच्या गोंडस लेकीचं नाव ठेवलं आहे. “प्रतीक्षा संपली! माझ्या हृदयाच्या नवीन राणीचं आमच्या आयुष्यात आगमन झालं आहे. बाळ व आई दोघेही सुखरुप आहेत. हलिमा आतिफ अस्लमकडून रमजानच्या शुभेच्छा”, असं कॅप्शन आतिफने पोस्टला दिलं आहे. आतिफच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> ३० लाखांची गाडी घेतल्यानंतर ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे फारच खास

हेही वाचा>> …अन् संजय राऊतांनी केलेलं कंगना रणौतच्या चित्रपटाचं कौतुक, म्हणाले “झाशीच्या राणींवर…”

२०१३मध्ये आतिफने साराशी लाहौरमध्ये निकाह केला होता. त्यांना अब्दुल व अर्यान ही दोन मुले आहेत. पाकिस्तानी सिंगर असलेल्या आतिफने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. त्याची अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:00 IST

संबंधित बातम्या