Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल | bollywood singer neha bhasin wear bikni and dance in front of camera she getting trolled for her bold look see details | Loksatta

Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल

नेहा भसीनने बिकिनी परिधान करत डान्स केला आहे.

Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल
नेहा भसीनने बिकिनी परिधान करत डान्स केला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ व ‘बिग बॉस १५’ या शोमुळे प्रकाश झोतात आलेली गायिका म्हणजे नेहा भसीन. नेहाने अलिकडेच तिचा ४०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिने तिच्या मित्र-मंडळींसाठी जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. रात्रभर सुरू असलेल्या या पार्टीदरम्यानचे नेहाचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. तसेच तिच्या या व्हिडीओंची चर्चाही रंगली. आता नेहा तिच्या बोल्ड लूकमधील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून…” वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’ प्रसंग

नेहानेच्या वाढदिवसाला कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी उपस्थित होती. यावेळी नेहाने बोल्ड ड्रेस परिधान केला होता. मध्यरात्रीपर्यंत तिची ही पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नेहा टेबलावर चढून, चप्पन न घालता बेभान होऊन नाचताना दिसली. तसेच टेबलावर असणारे दारूचे ग्लास इतकंच काय तर तिला तिचा ड्रेसही सांभाळता येईना हे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पुन्हा एकदा नेहा तिच्या व्हिडीओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नेहाने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. बिकिनी परिधान करत ती डान्स करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेहाचा हा नवा लूक तसेच व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस मात्र पडला नाही. हेच बघायचं बाकी होतं, नेहाला नक्की काय झालं आहे, असे व्हिडीओ पोस्ट करणं चुकीचं आहे असं नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 20:40 IST
Next Story
आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं, नीतू कपूर यांनी नातीचं नाव ठेवलं…