scorecardresearch

सोनू निगम कॉन्सर्टमधून कमावतो लाखो रुपये, फक्त एका गाण्यासाठी घेतो ‘इतके’ मानधन

Sonu Nigam: कॉन्सर्टमधील एका गाण्यासाठी सोनू निगम किती पैसे घेतो माहीत आहे?

sonu nigam concert fees
सोनू निगम कॉन्सर्टमधून कमावतो लाखो रुपये. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनू निगम व त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सोनू निगमच्या कॉन्सर्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

‘संदेसे आते है’, ‘अभी मुझमें कहीं’, ‘हिरवा निसर्ग’ यांसारख्या गाण्यांनी सोनू निगमने चाहत्यांना वेड लावलं. सोनू निगम बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. सुमधूर आवाजाने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याचे लाखो चाहते आहेत. सोनू निगमच्या कॉन्सर्टलाही त्याला लाइव्ह पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी चाहत्यांची गर्दी असते. त्याच्या एका कॉनर्सचं तिकीट हजारोंच्या घरात आहे.

हेही वाचा>> VIDEO: “बच गया, नही तो मर जाता”, धक्काबुक्कीच्यावेळी काय घडलं? स्वतः सोनू निगमनेच सांगितलं, म्हणाला…

सोनू निगम कॉन्सर्टमधून लाखो रुपये कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार, सोनू निगम कॉन्सर्टमध्ये हजेरी लावण्यासाठी लाखो रुपयांचे मानधन घेतो. याशिवाय लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एक गाणं गाण्यासाठी सोनू निगम ९-१० लाख रुपये आकारतो. कॉन्सर्टमधून लाखोंची कमाई करणारा सोनू निगम ४०३ कोटींचा मालक आहे. महिन्याला तो जवळपास दोन कोटींची कमाई करतो.

हेही वाचा>> सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…”

कॉन्सर्ट दरम्यान नेमकं काय घडलं?

सोमवारी(२० फेब्रुवारी) चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोनू निगमही उपस्थित होता. कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी मंचावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचं नाव स्वप्नील फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 10:47 IST
ताज्या बातम्या