Premium

Video : “मी मुस्लीम आहे, आम्ही…”, “देशासाठी काय करतोस?” प्रश्नावर शाहरुख खानने दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

shahrukh-khan
शाहरुख खान (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. शाहरुख आता सलमान खानच्या टायगर ३ मधूनही कॅमिओ करणार आहे. दरम्यान शाहरुखचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- 72 Hoorain : दहशतवाद, ७२ कुमारिका मुली अन्…; ‘द केरला स्टोरी’ नंतर येणार ‘७२ हूरें’, टीझर प्रदर्शित

हा व्हिडिओ ७ मार्च रोजी शाहरुख खानच्या srkbeedcfc या फॅन अकाऊंटने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. पण अचानक हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ २०१४ सालचा आहे. जेव्हा शाहरुख त्याच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशन कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने शाहरुखला ‘तू देशासाठी काय करतो?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर शाहरुखने दिलेलं उत्तर चांगलेच चर्चेत आलं होतं. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाहरुख म्हणाला होता, ”मी मुस्लिम आहे. म्हणून मी जे सामाजिक कार्य करतो ते आम्ही वैयक्तिक ठेवतो.” शाहरुखच्या या उत्तरानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेकजण हजरजबाबीपणाचं कौतुक करत आहे. तर काही जण त्याने मुस्लिम असल्याचे का अधोरेखित केले? असं म्हणत नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा- “तुझं तोंड…”; बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याच्या नवाजुद्दीनच्या वक्तव्याची प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला…

शाहरुख खानने २०१३ मध्ये मीर फाउंडेशनची स्थापना केली. वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावावरून त्यांनी या फाउंडेशनचे नाव ठेवले. या अंतर्गत ते महिलांच्या भल्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करतात. मीर फाउंडेशन प्रामुख्याने अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना मदत करते. याशिवाय शाहरुख खान त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीच्या अंतर्गत अनेक प्रसंगी धर्मादाय कार्य करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 19:01 IST
Next Story
72 Hoorain : दहशतवाद, ७२ कुमारिका मुली अन्…; ‘द केरला स्टोरी’ नंतर येणार ‘७२ हूरें’, टीझर प्रदर्शित