scorecardresearch

बॉलिवूड कलाकारांच्या मुलांच्या रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये नेमकं काय घडतं? ‘ते’ Inside Photos व्हायरल

स्टारकिड्सच्या पार्ट्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, पण या पार्ट्यांमध्ये नेमकं घडतं तरी काय?

star kids late night party
स्टारकिड्सच्या पार्ट्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, पण या पार्ट्यांमध्ये नेमकं घडतं तरी काय?

बॉलिवूड कलाकारांच्या पार्ट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. रात्रभर सुरू असलेल्या या पार्ट्यांमध्ये अनेक कलाकार मंडळी हजेरी लावताना दिसतात. पण गेल्या काही वर्षांपासून एक नवा ट्रेंड बी-टाऊनमध्ये सुरू झाला आहे. बॉलिवूड कलाकारांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स एकत्र येऊन रात्रभर पार्टी करताना दिसतात. यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

आणखी वाचा – “खूप मेहनत घेतो पण…” समीर चौघुलेंच्या वडिलांनी व्यक्त केली ‘ती’ खंत, म्हणाले, “आमचं एकमेकांशी…”

अलिकडेच शाहरुख खानची लेक सुहाना खान, अजय व काजोल देवगणची लेक न्यासा देवगण या रात्रभर सुरू असेल्या पार्टीमुळे ट्रोल झाल्या होत्या. बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचा मित्र ओरहान अवत्रामणीने (औरी) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बऱ्याच पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या पार्ट्यांमध्ये कोणी अगदी रोमँटिक अंदाजामध्ये डान्स करताना दिसतात तर कोणी दारूचं व्यसन करतानाही दिसतं. बऱ्याचदा औरी या पार्ट्यांचे आयोजन करतो.

या पार्ट्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतात. रात्रभर डान्स, मस्ती या पार्ट्यांमद्ये सुरू असते. काही दिवसांपूर्वीच न्यासा देवगण एका पार्टीमधून बाहेर येताना दिसली. यावेळी चालताना तिचा तोल गेला.

दरम्यान न्यासाने नशा केली असल्याचं व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी म्हटलं. शिवाय शाहरुख खानचा लेक आर्यन खान, श्वेता तिवारीही या पार्ट्यांमध्ये दिसतात.

शनाया कपूर, दिशा पटानी, भूमी पेडणेकर, अर्जून रामपालची मुलगी माहिका सारखे सेलिब्रिटीही या पार्ट्यांमध्ये उपस्थित असतात. या पार्ट्यांमध्ये या मंळींनी परिधान केलेले ड्रेसही चर्चेचा विषय ठरतात.

तर नशा करणं हा या मुलांचा उद्देश असतो असं नेटकरी बोलताना दिसतात. इतकंच नव्हे तर या स्टारकिड्सच्या आई-वडिलांच्या संस्कारांबाबतही अनेक प्रश्न नेटकरी उपस्थित करतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 18:46 IST
ताज्या बातम्या