scorecardresearch

सुपरहिट चित्रपट, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर बोल्ड सीन्स अन् अचानक एकेदिवशी….; आता कुठे आहे बॉलिवूडची ‘टारझन गर्ल’?

किमी काटकरने तिच्या करिअरमध्ये ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

सुपरहिट चित्रपट, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर बोल्ड सीन्स अन् अचानक एकेदिवशी….; आता कुठे आहे बॉलिवूडची ‘टारझन गर्ल’?
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री किमी काटकरचा मोठा चाहतावर्ग होता. एकेकाळी बॉलिवूडवरही किमीची जादू चालायची. ‘टारझन गर्ल’ या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री किमीचा चित्रपट प्रवास खूप मोठा नसला तरी संस्मरणीय नक्कीच होता. ९०च्या दशकातील तिच्या चित्रपटांचे अनेक चाहते आपल्याला आजही पाहायला मिळतात. कमी चित्रपट करूनही या अभिनेत्रीने खूप नाव कमावले. मात्र काही काळानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. आता ही अभिनेत्री ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली, तरी तिच्या चित्रपटांची मात्र अनेकदा चर्चा होते. अभिनेत्री किमी काटकर सध्या काय करते आणि कुठे राहते ते जाणून घेऊयात.

किमीने १९८५ मध्ये ‘पत्थर दिल’मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत १९९१ मध्ये आलेल्या ‘हम’ चित्रपटात काम केलं होतं. तिच्या ‘जुम्मा चुम्मा’ या लोकप्रिय गाण्याने तेव्हा खळबळ माजवली होती. या गाण्यानंतर किमीला नवी ओळख मिळाली आणि ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ टारझन’ चित्रपटात बोल्ड सीन्स देऊन ती ‘टारझन गर्ल’ म्हणून इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली. १९८० के १९९०च्या दरम्यान, किमीने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केलं. तिने अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

“जॅकला वाचवता आलं नसतंच कारण…”; टायटॅनिकला २५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर दिग्दर्शकाचा खुलासा

‘टारझन गर्ल’ किमीने तिच्या १२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिने १९९२ मध्ये लग्न केलं. किमीने बॉलीवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि निर्माता शंतनू शौरीशी लग्न केलं होतं, त्यानंतर तिने चित्रपटसृष्टी सोडली. अभिनेत्री शेवटची १९९२ मध्ये आलेल्या ‘जुर्म की हुकूमत’मध्ये दिसली होती. या चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. लग्नानंतर किमी तिच्या कौटुंबिक जीवनात रमली, नंतर तिने एका मुलाला जन्म दिला. काही रिपोर्ट्सनुसार, किमी लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती, तर, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती आता गोव्यात तिच्या कुटुंबाबरोबर राहत आहे.

बॉलिवूड सोडल्यानंतर एकदा किमीने एका फिल्म मॅगझिनला मुलाखत दिली होती. त्यात तिने अभिनयाचा कंटाळा आला असून स्थिर आयुष्य जगायचं असल्याने चित्रपटसृष्टी सोडल्याचं कारण सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 19:49 IST

संबंधित बातम्या