बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना होऊन गेला तरी ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. अवघ्या महिनाभरातच या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर करत पठाणचे इतर भाषेतील कमाईचे आकडे सांगितले आहेत.

ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श सोशल मीडियावर सक्रीय असतात. बॉलिवूड चित्रपटांचे समीक्षण आणि कमाईबद्दलचे अपडेट्स ते देत असतात. त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे तामिळ, तेलगू भाषेतील कमाईचे आकडे दिले आहेत. गेल्या आठवडयातील ‘पठाण’ची कमाई आहे १८. १६ कोटी तर हिंदी तामिळ आणि तेलगू या तिन्ही भाषेची मिळून एकूण ५२५. ७६ कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘बाहुबली २’ च्या कमाईच्या जवळ आता ‘पठाण’ पोहचला आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
71 Kg Weight Loss In Two Years By CEO Dhruv Agrawal Diet Plan Exercise Routine
७१ किलो वजन दोन वर्षांत कमी करताना प्रसिद्ध सीईओने पाळलं ‘हे’ डाएट; पुन्हा वजन वाढू नये याचं सिक्रेटही सांगितलं

‘DDLJ’ सारख्या अजरामर चित्रपटाच्या रिमेकवर काजोलने दिली प्रतिक्रिया; म्हणाली…

दरम्यान ‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.

‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.