bollywood update maliaka arora and arbaz khan spotted together at airport to recieve their son spg 93 | मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले.... | Loksatta

मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…

त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मलायका अरोरा सध्या चर्चेत आहे. नुकतेच तिने ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ असं या कार्यक्रमाचे नाव असून त्याचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. मलायकाने यात आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबद्दल चर्चा फराह खानबरोबर केली आहे. मलायकाने तिचं पहिलं लग्न व पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानबाबतही या मुलाखतीत भाष्य केलं. आणि दुसरीकडे हे दोघे पुन्हा एकत्र दिसले.

मलायका अरबाज यांचा घटस्फोट २०१७ साली झाला आहे. त्यांना अरहान हा मुलगा आहे. या मुलासाठी ते कायम एकत्र येत असतात. अरहान नुकताच मुंबईत परतला आहे. त्याला विमानतळावर भेटण्यासाठी हे दोघे गेले होते. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे आई वडील मुलाचे स्वागत करत आहेत. मुलाला भेटताच दोघांनी त्याला मिठी मारली आहे.

लग्नानंतर हंसिका मोटवानी पतीसह मुंबईत दाखल; हनिमूनच्या प्रश्नावर लाजत म्हणाली….

मलायका अरबाज पुन्हा एकत्र दिसल्याने तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. काहींनी मलायकाचं कौतुक केलं आहे, ते म्हणाले “आई शेवटी आई असते.” एकाने लिहलं आहे, “दोघे विभक्त जरी झाले असतील तरी ते जागरूक पालक आहेत.” मुलाच्याबाबतीत ते आपले कर्तव्य बजावत आहेत. आणखीन एकाने लिहले आहे” दोघांनी आपले मतभेद बाजूला सारून मुलासाठी एकत्र आले आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे.”

मलायका व अरबाज १९९८ साली विवाहबंधनात अडकले होते. परंतु, १८ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:02 IST
Next Story
अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनाबद्दल प्रियांका चोप्राने व्यक्त केली नाराजी; म्हणाली…