चित्रपटसृष्टीत स्टारकिड्सची खूप चर्चा होत असते. आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सेलिब्रिटींची मुलं या क्षेत्रात येतात. पण भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची लेक अभिनयापासून दूर आहे. या अभिनेत्रीचे पती प्रसिद्ध उद्योगपती आहे. तसेच ते शाहरुख खानचे बिझनेस पार्टनर आहेत. ही अभिनेत्री म्हणजे ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला होय. जुही चावलाच्या पतीचे नाव जय मेहता आहे. जुही व जय यांना जान्हवी ही मुलगी व जय हा मुलगा आहे. अभिनेत्री जुही चावला यांची लेक काय करते, ते जाणून घेऊयात.

जय मेहता यांचा मेहता ग्रुप अमेरिका, कॅनडा, युगांडा आणि केनियासह जगभरात व्यवसाय चालवतो. तसेच १९९९ मध्ये, अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता यांनी शाहरुख खानबरोबर मिळून ड्रीम अनलिमिटेड ही निर्मिती कंपनी सुरू केली होती. आज ती रेड चिलीज एंटरटेनमेंट म्हणून ओळखली जाते.

शाहरुख खानचे बिझनेस पार्टनर आहेत जय मेहता

शाहरुख खानचे बहुतांशी चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनी अंतर्गत तयार केले जातात. त्याचे जवान आणि डंकी चित्रपट रेड चिलीजने तयार केले होते आणि त्यांनी चांगले कलेक्शन केले होते. तसेच मेहता ग्रुप हा शाहरुख खानच्या आयपीएल संघ, कोलकाता नाईट रायडर्समध्ये भागधारक आहे. जान्हवी मेहता तिच्या वडिलांबरोबर आयपीएल लिलावात सहभागी होत असते.

जान्हवी मेहताचा जन्म २१ फेब्रुवारी २००१ रोजी झाला. जान्हवी आता २५ वर्षांची आहे. जान्हवीने कोलंबिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. जान्हवीने आईप्रमाणे अभिनय न निवडता, वडिलांप्रमाणे बिझनेस करायचं ठरवलं. जान्हवी लाइमलाइटपासून दूर राहते. पण ती आई-वडिलांबरोबर आयपीएल लिलावात सहभागी होत असते.

हुरुन इंडियाने २०२५ मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती. जुही चावला ही बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ३३५ लोकांच्या या यादीत अभिनेत्री जुही चावलाचे नाव टॉप २० मध्ये होते. वृत्तानुसार, जुही चावलाची मालमत्ता ७,७९० कोटी इतकी आहे. मेहता ग्रुपच्या मालमत्तेमुळे तिच्या संपत्तीत ही वाढ झाली आहे. जान्हवी मेहता ४,६०० कोटींच्या संपत्तीची वारस आहे.