scorecardresearch

Premium

अजय देवगणच्या ‘मैदान’च्या प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींमुळे हताश झाले बोनी कपूर; म्हणाले “माझी झोप उडाली…”

हा चित्रपट ज्या वेगाने पुढे ढकलला जातोय ते फारच चिंताजनक असल्याचं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं आहे

boney-kapoor-maidaan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा आणि अभिनेता अजय देवगण यांचा ‘मैदान’ हा सातव्यांदा पुढे ढकण्यात आल्याने आता या चित्रपटाबद्दल सगळेच लोक चिंता व्यक्त करत आहेत. आधी गेल्यावर्षी हा चित्रपट ‘आरआरआर’सह प्रदर्शित केला जाणार होता, पण नंतर त्याची तारीख बदलून जून २०२३ अशी करण्यात आली, पण नंतरही काही कारणास्तव चित्रपट पुढे ढकलला गेला आहे.

चित्रपटाचा टीझर येऊनसुद्धा ६ महीने उलटून गेले आहेत तरी चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. नुकतंच याचे निर्माते बोनी कपूर यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. हा चित्रपट ज्या वेगाने पुढे ढकलला जातोय ते फारच चिंताजनक असल्याचं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच या चित्रपटाच्या प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींचा त्यांनाही त्रास होत असल्याचं त्यांनी कबूल केलं.

amit-rai-omg2
‘OMG 2’चे दिग्दर्शक यांनी ‘CBFC’ला म्हटलं ढोंगी; म्हणाले, “रॉकी और रानीमधील किसिंग…”
Vivek Agnihotri yes Nana Patekar beats up directors
“वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…”
shahrukh-khan-fees
‘जवान’च्या यशानंतर शाहरुख खानने वाढवले त्याचे मानधन; जवळच्या व्यक्तीने दिलं स्पष्टीकरण
Jawan Director atleeJawan Director atlee
गोष्ट पडद्यामागची: ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटलीचा ‘तो’ किस्सा अन् चित्रपटाचं पुणे कनेक्शन!

आणखी वाचा : चंकी पांडेसह काम करण्यास दिव्या भारतीने दिलेला नकार; निर्माते पेहलाज निहलानी यांचा खुलासा

‘न्यू इंडियन’शी संवाद साधताना बोनी कपूर म्हणाले, “हा चित्रपट भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ आपल्यासमोर सादर करणार आहे. हा चित्रपट गेल्यावर्षीच प्रदर्शित होणार होता, पण अद्याप माझ्या हातात याचा ट्रेलरही आलेला नाही. हा चित्रपट सोडला तर माझी कुठलीच देणी द्यायची बाकी नाहीत. मी कधीच निराश झालेलो नाही, हार मानलेली नाही पण मैदानची अवस्था पाहून माझी झोप उडाली आहे.”

पुढे बोनी म्हणाले, “आयुष्यात प्रथम असं झालंय की काही गोष्टी माझ्याही हातात नाहीत. यात माझे काही सहनिर्माते आणि अभिनेते यांचेही पैसे अडकले आहेत. मी कोणतंही मोठं पाऊल उचलू शकत नाही कारण संपूर्ण टीम माझ्यावर अवलंबून आहे. आम्ही खूप काही सहन केलं आहे. आम्ही एक संपूर्ण फुटबॉलचं ग्राऊंड उभं केलं तेही नैसर्गिकरित्या गवत उगवून, कारण हा चित्रपट ५० व ६० च्या दशकातला असल्याने कृत्रिम गवत दाखवून चालणार नव्हतं. हा एवढा सेट उभा राहायला तीन वर्षं लागली अन् आमचं बजेट वाढलं, हे सगळं सांभाळणं कठीणच होतं. आमच्या चित्रपटावर तेव्हा ५०० ते ६०० लोक दिवसाला काम करायचे, त्यांचं सगळ्यांचं जेवण ताजमधून यायचं, याबरोबरच सेटवर ३ रुग्णवाहिका कायम असायच्या.”

आणखी वाचा : हस्तमैथुनसारख्या विषयामुळे सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेला ‘OMG 2’ आता ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

यानंतरही अडचणी थांबल्या नाहीत. कोविड, चक्री वादळामुळे झालेलं ग्राऊंडचं नुकसान यामुळे आणखी बिकट अवस्था झाली. बोनी म्हणाले, “कोविड आणि वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिक फटका बसला. यामुळे सगळंच आणखी अवघड होत गेलं अन् दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळं नुकसान भरून काढण्यासाठी कोणताही विमा, इन्शुरेस नाहीये.” अशा रीतीने अजूनही ‘मैदान’चं भवितव्य अंधारातच आहे, अद्याप निर्मात्यांनी याबाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boney kapoor says postponement of ajay devgn starrer maidan is giving his sleepless nights avn

First published on: 03-10-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×