बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. एकीकडे अनेक चित्रपटांची चित्रीकरणं सुरू आहेत, तर दुसरीकडे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आता या सगळ्यामध्ये जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात बोनी कपूर यांनी श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं.

आणखी वाचा : नोबेल पुरस्कार विजेत्या मलालाची खिल्ली उडवणं कॉमेडियन हसन मिन्हाजला भोवलं, प्रियांका चोप्राने घडवली अद्दल

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन चित्रपटसृष्टीत आली. ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली. मात्र तिच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तिची तुलना तिच्या आईशी, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली गेली. श्रीदेवी यांच्या मानाने जान्हवीला चांगला अभिनय करता येत नाही, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टिका केली होती. आता यावर बोनी कपूर यांनी त्यांचे मत मांडत जान्हवीची बाजू घेतली आहे.

‘मिली’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी त्यांना जान्हवी आणि श्रीदेवी यांच्यात होणाऱ्या तुलनेवर प्रश्न विचारण्यात येत होता. पत्रकाराला मध्येच थांबवून बोनी कपूर यांनी “जान्हवी आणि श्रीदेवी यांची तुलना करू नाका”, असे सांगितले. पुढे त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, “एखाद्या भूमिकेत शिरून ती उत्तमप्रकारे साकारणे ही श्रीदेवीची खासियत होती. जान्हवीनेही ते आत्मसात केलं आहे. ती त्या भूमिकेला आपलंसं करते म्हणून मोठ्या पडद्यावरील तिची प्रगती तुम्ही बघू शकत आहात.”

पुढे ते म्हणाले, “श्रीदेवीने लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. १५० ते २०० दक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी श्रीदेवीचे काम पाहिले. जान्हवीने तर आत्ताच तिचे करिअर सुरु केले आहे. जान्हवीसाठी वेगळा प्रवास आहे आणि तो छान असणार याची मला खात्री आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या कोणत्याही कामाशी जान्हवीची तुलना करू नका.”

हेही वाचा : उणे १६ तापमान असलेल्या खोलीतून कशी बाहेर पडणार जान्हवी कपूर?, ‘मिली’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनेवर आधारित ‘मिली’ चित्रपटात जान्हवी कपूर ‘मिली नौटियाल’ या विद्यार्थीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केलेली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी पहिल्यांदाच तिच्या वडिलांची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले असून या चितरपटाचे संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.