अनेक वर्ष प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भारावून टाकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक श्रीदेवी होत्या. २०१८ साली त्यांचं निधन झालं. त्यांचा निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. आज त्या आपल्यात नसल्या तरीही त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. तर आता त्यांचं आयुष्य पुस्तकातून उलगडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी – द लाइफ ऑफ अ लीजेंड’ या बायोग्राफीची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यांचे पती बोनी कपूर यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करत असताना या पुस्तकाचं काम कुठपर्यंत आलंय हेही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : स्टारकिड असल्याचा जान्हवी कपूरला होतोय पश्चाताप? म्हणाली, “माझं नुकसान झालं कारण…”

श्रीदेवी यांच्याबद्दल आणि त्यांच्या जीवनावर आधारित या बायोग्राफीबद्दल व्यक्त होण्यासाठी बोनी कपूर यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, “तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची ताकद होती. जेव्हा जेव्हा ती तिच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावरून भेटायला यायची, तेव्हा तेव्हा ती सर्वात जास्त खुश असायची. ती खूप निडर होती. धीरज कुमार यांना ती आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य मानायची आणि आज ते श्रीदेवीच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहीत आहेत याचा आम्हाला फार आनंद आहे. ते एक संशोधक आणि लेखक आहेत.”

हेही वाचा : श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…

सध्या या पुस्तकाचं लिखाण सुरू असून ही बायोग्राफी या वर्षाच्या अखेरपर्यंत चाहत्यांच्या भेटीला येईल. बोनी कपूर यांनी केलेलं हे ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देत श्रीदेवी यांचे चाहते या बायोग्राफीबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bonny kapoor announced biography about the life of sridevi rnv
First published on: 09-02-2023 at 14:28 IST