Border 2 Box Office Collection Day 12: गेल्या काही दिवसांत अनेक मराठी, हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये बॉर्डर २ चादेखील समावेश आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू होती.

२३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाने उत्तम कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात मात्र या कमाईत घट पाहायला मिळाली. तिसऱ्या आठवड्यात बॉर्डर २ च्या कमाईत पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे.

आता या चित्रपटाने १२ व्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊ…

‘बॉर्डर २’ ने १२ व्या दिवशी किती केली कमाई?

बॉर्डर २ने १२ व्या दिवशी ६.६९ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३१५. १० कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, निर्मात्यांनी मंगळवारी तिकिटांचे दर फक्त १४९ रुपये इतकेच ठेवले होते. मात्र, तरीही तरी त्याचा कमाईवर परिणाम झाल्याचे दिसले नाही.

बॉर्डर २ची ही कमाई समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, तरीही हा चित्रपट गदर २ च्या कमाईपेक्षा मागे आहे. सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला गदर २ने २व्या दिवशी ४०० कोटींची कमाई केली होती.

वरुण धवनसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरला आहे. याचे कारण म्हणजे कोव्हिडनंतर त्याचे जे चित्रपट प्रदर्शित झाले, ते अपेक्षित यश मिळवू शकले नव्हते. बॉर्डर २ आता त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

जर धुरंधरबरोबर बॉर्डर २ ची तुलना केली तर त्या चित्रपटाच्या तुलनेत अजूनही हा चित्रपट मागे आहे. धुरंधरने १२व्या दिवशी ३० कोटींची कमाई केली होती. भारतातील ही कमाई ४११ कोटी इतकी झाली आहे.

१२ दिवसांच्या काळात बॉर्डर २ने १०२.९५ कोटींची कमाई केलेला स्काय फोर्स , १७८.५ कोटींची कमाई केलेला फायटर आणि ६०.९५ कोटींचा कमाई असलेला सॅम बहादूर यांसारख्या मोठ्या चित्रपटांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

‘बॉर्डर २’ ची सध्या राणी मुखर्जीच्या मर्दानी ३ बरोबर स्पर्धा सुरू आहे. कमी स्क्रीनवर प्रदर्शित होऊनही मर्दानी ३ने पाच दिवसांत २१.९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. असे असून तो अजूनही चांगली कामगिरी करत आहे. आता ‘बॉर्डर २’हा ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करणार आहे.

दरम्यान, सनी देओल या चित्रपटानंतर इक्का या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय खन्नादेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.