Border 2 Box Office Collection Day 6: १९९७ ला प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले होते.

बॉर्डर चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेमामुळेच ‘बॉर्डर २’ या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत होते.

२३ जानेवारीला ‘बॉर्डर २’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉर्डर २’ने सुरुवातीला उत्तम कमाई केली, त्यानंतर मात्र चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे दिसले.

‘बॉर्डर २’ने सहाव्या दिवशी किती केली कमाई?

सहा दिवसांत या चित्रपटाने भारतात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता चित्रपटाने सहाव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊ…

सॅल्कनिकनुसार, ‘बॉर्डर २’च्या कमाईत पहिल्याच आठवड्यात मोठी घट झाली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठवड्याच्या शेवटी त्याने १०० कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली होती.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३६.५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५४.५ कोटींची कमाई केली आहे, तर चौथ्या दिवशी चित्रपटाने ५९ कोटींची कमाई केली आहे; त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी २६ जानेवारीला चित्रपटाने २० कोटींची कमाई केली. त्यानंतर मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली.

सिनेमाने सहाव्या दिवशी १३ कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाने भारतात एकूण २१३ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने २९२.१ कोटींची कमाई केली आहे.

‘बॉर्डर २’ हा सनी देओलच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. ‘गदर २’ नंतर ‘बॉर्डर २’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. फक्त सनी देओलच नाही तर वरुण धवन, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

‘बॉर्डर २’चे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी यांच्याबरोबरच मोना सिंग, सोनम बाजवा, मेधा राणा, करण जोतवाणी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

दरम्यान, आता आगामी काळात हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.