scorecardresearch

Premium

फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांचं आहे प्रकरण

चित्रपट निर्माता बंटी वालियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

bunty-walia
संजय दत्त अभिनीत चित्रपटाशी संबंधित आहे प्रकरण

चित्रपट निर्माता जसप्रीत सिंग वालिया उर्फ ​​बंटी वालियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात आयडीबीआय बँकेने फसवणुक केल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी वालियाने केलेल्या फसवणुकीमुळे आयडीबीआय बँकेला ११९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी दिली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जून २००८ मध्ये बंटी वालिया व इतरांच्या वैयक्तिक हमीवर दोन कर्जे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याची कंपनी जीएस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडला एका वित्त योजनेअंतर्गत २३.५ लाख डॉलरच्या विदेशी चलनाचे लोन आणि ४.९५ कोटी रुपयांचे आरटीएल देण्यात आले होते. ही रक्कम संजय दत्त व बिपाशा बासू स्टारर ‘लम्हा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी देण्यात आली होती.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

“तुझी जात कोणती?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…

हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु प्रमोटर्स आणि प्रदर्शक यांच्यातील वादामुळे त्याचे प्रदर्शन रखडले. यानंतर ३० सप्टेंबर २००९ रोजी हे अकाउंट नॉन-परफॉर्मिंग अॅसेट बनले. बँकेने जीएसईपीएल, पीव्हीआर आणि खासगी बँक यांच्यातील त्रिपक्षीय करारावर तोडगा काढत चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी पीव्हीआरची वितरक म्हणून नियुक्ती केली. तसेच पीव्हीआरपोस्ट-प्रॉडक्शन कामासाठी ८ कोटी रुपये गुंतवेल, असा करार केला.

“माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

बँकेचा आरोप आहे की पीव्हीआर आपल्याला कराराचे पालन करण्यात अपयशी ठरले. त्यांचे सुमारे ८३.८९ लाख रुपयांचे नुकसान झाले. कारण, कंपनीचे एकूण उत्पन्न केवळ ७.४१ कोटी रुपये होते, तर कंपनीने जाहिरात आणि वितरणावर ८.२५ कोटी रुपये खर्च केले होते. कंपनीने बनावट वापर प्रमाणपत्र सादर केल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालं. त्यांनी बँकेचा निधी वळवला आणि अकाउंट बूक्समध्ये फेरफार केला, असे आरोपही बँकेने केले आहेत.

“चाळीतलं बालपण, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा…” प्रिया बापटचा थक्क करणारा प्रवास; म्हणाली, “दादर म्हणजे…”

बँकेने जीएसईपीएलवर फसवणूक, खोटे बोलणे, खोटे रेकॉर्ड, सार्वजनिक पैशांचा गैरवापर, चुकीची माहिती देणे आणि विश्वासार्हतेचा उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात बंटी वालिया, जीएसईपीएल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 07:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×