Anshula Kapoor Wedding Reception Videos: अभिनेता अर्जुन कपूरची बहीण आणि बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर ६ जुलै रोजी तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करबरोबर विवाहबंधनात अडकली. हा विवाहसोहळा अत्यंत खासगी होता. लग्नाला केवळ दोन्ही कुटुंब, नातेवाईक आणि काही जवळचे मित्रच उपस्थित होते. लग्नानंतर मंगळवारी (७ जुलै) मुंबईत रोहन आणि अंशुला यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला.

या रिसेप्शनला कपूर कुटुंबासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये रेखा, जिनिलिया आणि रितेश देशमुख, बॉबी देओल, अंजली धवन, दिग्दर्शक अ‍ॅटली आणि त्याची पत्नी प्रिया, रकुल प्रीत सिंग आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.

अंशुला कपूरचा ग्लॅमरस लूक

आपल्या रिसेप्शनसाठी अंशुलाने एका मॉडर्न स्टाईलच्या साडीची निवड केली होती, ज्यावर तिने ऑफ-शोल्डर ब्लाउज परिधान केला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात एक हेवी नेकलेस घातला होता आणि केसांचा ‘हाय बन’ बांधला होता. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.

अंशुलाचा हा लूक सर्वसामान्य नववधूंपेक्षा खूप वेगळा होता. लग्नानंतर सहसा नववधू चुडा आणि मंगळसूत्र अशा पारंपरिक रूपात दिसतात, मात्र अंशुलाच्या लूकमध्ये या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. दुसरीकडे, तिचा पती रोहन टक्कर याने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

अंशुला कपूर व रोहन ठक्करचा रिसेप्शन लूक

बहिणीच्या रिसेप्शनला शनायाचा कपूरचा ग्लॅमरस लूक

अंशुलाच्या रिसेप्शनमध्ये जान्हवी कपूरच्या बॅकलेस ब्लाऊजची चर्चा

अंशुलाच्या रिसेप्शनला पोहोचल्या सदाबहार रेखा

अंशुला-रोहनच्या रिसेप्शनमध्ये रितेश-जिनिलीयाने वेधलं लक्ष

बहिणीच्या रिसेप्शनसाठी अर्जुन कपूरचा खास लूक

रिसेप्शनला भूमी पेडणेकरची हजेरी

रिसेप्शनला पोहोचले चंकी पांडे

अंशुलाच्या रिसेप्शनला पोहोचला आदित्य रॉय कपूर

रिसेप्शनला नुपूर सेनॉन व तिच्या पतीची हजेरी