Chetak Screen Awards 2026 : ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ च्या निमित्ताने बॉलीवूडमधील काही जुने किस्से चांगलेच चर्चेत आहेत. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह व अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत असाच एक किस्सा २०१६ च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये घडला होता. अनावधानाने अमिताभ बच्चन हे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यातील एका रोमँटिक इशाऱ्यांमध्ये आले होते.

२०१६ मध्ये झालेल्या २२ व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना त्यांच्या दोन चित्रपटांसाठी अवॉर्ड्स देण्यात आले होते. रणवीरला ‘बाजीराव मस्तानी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर दीपिकाला ‘पिकू’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मात्र, पुरस्कारांपेक्षाही जास्त चर्चा त्यांच्यातील केमिस्ट्रीची झाली होती.

कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंहने अतिशय उत्साही परफॉर्मन्स दिला आणि क्रेनच्या साहाय्याने स्टेजवर एन्ट्री घेतली. यावेळी तो दीपिका पादुकोणकडे बघून रोमँटिक इशारे करत होता. योगायोगाने, त्यावेळी दीपिकाच्या अगदी शेजारी अमिताभ बच्चन बसले होते. अमिताभ बच्चन यांना वाटलं की रणवीर हे इशारे कदाचित त्यांच्यासाठी करतोय, म्हणून त्यांनीही अतिशय विनम्रपणे आणि हसून त्या इशाऱ्यांना दाद दिली.

Award Banner

पाहा व्हिडीओ-

तेवढ्यात शेजारी बसलेल्या जया बच्चन यांनी त्यांना हळूच सांगितलं की, रणवीरचे हे इशारे त्यांच्यासाठी नसून दीपिकासाठी आहेत. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांना आपल्या गैरसमजाची जाणीव झाली. हा सगळा मजेशीर प्रकार पाहून सर्वजण हसू लागले होते. हा कन्फ्युजनचा क्षण इतका क्युट आणि मजेशीर होता की, त्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

इतकंच नाही तर, परफॉर्मन्स दरम्यान रणवीरने हवेत फेकलेला माईक थेट अमिताभ बच्चन यांच्या हातात पडला. ‘बिग बी’नी हसत तो माईक उचलला आणि मग तो दीपिका पादुकोणकडे दिला होता. हा प्रसंग अमिताभ बच्चन यांच्या इतका लक्षात राहिला की, २०२१ मध्ये ‘कोण बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीझनमध्ये जेव्हा दीपिका खास पाहुणी म्हणून आली होती, तेव्हा त्यांनी हा किस्सा शेअर केला होता.

स्क्रीन अवॉर्ड्समध्ये हा किस्सा घडला, तेव्हा दीपिका व रणवीर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१८ साली त्यांनी लग्न केलं होतं.