Chetak Screen Awards 2026: भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ सोहळा या रविवारी मुंबईत दिमाखात पार पडणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या स्पाय थ्रिलरने तब्बल २४ नामांकने मिळवून सर्वांचे लक्ष वेधले असून ‘सैयारा’ आणि ‘होमबाउंड’ शर्यतीत मागे नाहीत. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, सुनील ग्रोव्हर आणि झाकीर खान यांचे खुमासदार सूत्रसंचालन असणार आहे. ‘स्क्रीन अकादमी’च्या तज्ज्ञांनी निवडलेल्या विजेत्यांची नावे जाणून घेण्यासाठी आणि हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट अशा एकूण ३१ श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल. आदित्य धर यांच्या धुरंधर या ‘स्पाय थ्रिलर’ चित्रपटाला सर्वाधिक २४ नामांकनं मिळाली आहेत. तर सैयाराला १७ नामांकनं मिळाली असून होमबाउंडला १५ नामांकनं मिळाली आहे. विजेत्यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ने केली आहे. ही एक स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. यामध्ये ५० हून अधिक नामवंत चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

मुंबईत होणाऱ्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट करणार आहे. तिला साथ देण्यासाठी अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर, स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान आणि ‘द इंडियन एक्सप्रेस’चे (हिंदी) संपादक सौरभ द्विवेदी उपस्थित असतील.

Award Banner

दिग्गज कलाकारांची उपस्थिती आणि लाइव्ह प्रक्षेपण

चेतक स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. चित्रपट प्रेमींना यावर्षी हा संपूर्ण सोहळा रात्री ८ वाजेपासून युट्यूब, सोनी लिव्ह आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर लाइव्ह पाहता येईल.

स्क्रीन अवॉर्ड्सचा इतिहास

‘स्क्रीन अवॉर्ड्स’ची सुरुवात १९९५ साली झाली होती. स्क्रीन अवॉर्ड्स हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील कलागुणांना वाव देणारे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ राहिले आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाची चुरस कोणामध्ये?

धुरंधर (आदित्य धर)

छावा (दिग्दर्शक: लक्ष्मण रामचंद्र उतेकर)

धडक २ (दिग्दर्शक: शाझिया इक्बाल)

हक (दिग्दर्शक: सुपर्ण वर्मा)

सितारे जमीन पर (दिग्दर्शक: आर. एस. प्रसन्ना)

सुपरबॉईज ऑफ मालेगाव (दिग्दर्शक: रीमा कागती)

सैयारा (दिग्दर्शक – मोहित सुरी)

होमबाउंड (दिग्दर्शक – नीरज घायवान)

नव्या दिग्दर्शकांचा गौरव

‘ब्रेकथ्रू डेब्यु डायरेक्टर’ या पुरस्कारासाठी खालील दिग्दर्शकांना नामांकन मिळाले आहे-

इक्बाल (धडक २)

दिबाकर दास रॉय (दिल्ली डार्क)

अरण्य सहाय (ह्युमन्स इन द लूप)

करण सिंग त्यागी (केसरी चॅप्टर २)

करण कंधारी (सिस्टर मिडनाईट)

ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसाठी नामांकनं

आरती कडाव (मिसेस – Mrs)

हनी त्रेहान (रात अकेली है: द बन्सल मर्डर्स)

करण तेजपाल (स्टोलन – Stolen)

अनुषा रिझवी (द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली)

बोमन इराणी (द मेहता बॉईज)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकनं

तृप्ती डिमरी (धडक २)

यामी गौतम धर (हक)

कोंकणा सेन शर्मा (मेट्रो… इन दिनो)

कृती सॅनन (तेरे इश्क में)

राधिका आपटे (सिस्टर मिडनाईट)

सोनल मधुशंकर (ह्युमन्स इन द लूप)

मोनिका पनवार (निशांची)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकनं

विकी कौशल (छावा)

सिद्धान्त चतुर्वेदी (धडक २)

रणवीर सिंग (धुरंधर)

ईशान खट्टर (होमबाउंड)

मनोज बाजपेयी (जुगनूमा: द फेबल)

आदर्श गौरव (सुपरबॉईज ऑफ मालेगाव)

विशाल जेठवा (होमबाउंड)

या पुरस्कार सोहळ्यात केवळ दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि गायकच नव्हे, तर चित्रपट निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तंत्रज्ञांचाही विशेष गौरव केला जाणार आहे.

रेड कार्पेटवरील मज्जा-मस्ती आणि ग्लॅमर या पुरस्कार सोहळ्याला अधिक रंगतदार बनवणार आहे. आयुषी वोरा, अदिती अग्रवाल, अलीशा हझल, अनिता बोकेपल्ली यांसारख्या आघाडीच्या युट्यूब कंटेंट क्रिएटर्सना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. ते स्टार्सशी संवाद साधून खास क्षण टिपतील.

द इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या पत्रकारितेतील मूल्यांनुसार, हे पुरस्कार पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहेत.

स्क्रीन अकादमीचे सदस्य

१. अभिषेक चौबे – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
२. अमित रे – प्रोडक्शन डिझायनर
३. अमृतपाल सिंग बिंद्रा – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक
४. आनंद महिंद्रा – कला संरक्षक, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष
५. अनिल मेहता – सिनेमॅटोग्राफर
६. अतुल मोंगिया – कास्टिंग डायरेक्टर, अभिनय मार्गदर्शक
७. बिश्वदीप चटर्जी – साऊंड डिझायनर
८. दीपा भाटिया – चित्रपट संपादक, लेखक
९. दीपा मेहता – दिग्दर्शिका आणि लेखिका
१०. फिरोज अब्बास खान – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
११. गौरव गांधी – प्रमुख, अमेझॉन प्राइम व्हिडिओ (APAC)
१२. गौतम घोष – दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर
१३. गुनीत मोंगा कपूर – चित्रपट निर्माती
१४. जयदीप साहनी – पटकथा लेखक आणि गीतकार
१५. जॉन अब्राहम – अभिनेता आणि निर्माता
१६. कबीर खान – दिग्दर्शक
१७. करण जोहर – दिग्दर्शक, निर्माता, टॉक शो होस्ट
१८. कौसर मुनीर – गीतकार आणि पटकथा लेखक
१९. मनीष मल्होत्रा – फॅशन डिझायनर आणि निर्माता
२०. मनोहर वर्मा – ॲक्शन डायरेक्टर
२१. मॅक्सिमा बासू – कॉस्च्युम आणि फॅशन डिझायनर
२२. मुकेश छाबरा – कास्टिंग डायरेक्टर
२३. नागेश कुकुनूर – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
२४. नमित मल्होत्रा – चित्रपट निर्माता, DNEG चे जागतिक CEO
२५. नम्रता राव – दिग्दर्शिका आणि निर्माती
२६. निहारिका भसीन – कॉस्च्युम डिझायनर
२७. पायल कपाडिया – दिग्दर्शिका
२८. पूजा लढा सुरती – चित्रपट संपादक आणि लेखिका
२९. प्रीतम चक्रवर्ती – संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार
३०. प्रसेनजीत चॅटर्जी – अभिनेता आणि निर्माता
३१. आर. एस. प्रसन्ना – दिग्दर्शक
३२. राहुल ढोलकिया – दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
३३. राजीव मेनन – सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक
३४. राजकुमार हिराणी – चित्रपट संपादक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक
३५. राम माधवानी – दिग्दर्शक
३६. रमेश तौरानी – चित्रपट आणि संगीत निर्माता
३७. रवी चंद्रन – सिनेमॅटोग्राफर
३८. रसूल पुकुट्टी – साऊंड डिझायनर आणि निर्माता
३९. रिमा दास – लेखिका, दिग्दर्शिका आणि संपादक
४०. रॉनी स्क्रूवाला – चित्रपट निर्माता आणि उद्योजक
४१. साबू सिरिल – प्रोडक्शन डिझायनर
४२. समीर नायर – व्यवस्थापकीय संचालक, अप्लॉज एंटरटेनमेंट
४३. श्यामक दावर – कोरिओग्राफर
४४. शुजित सरकार – दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता
४५. सिद्धार्थ रॉय कपूर – चित्रपट निर्माता
४६. श्रीराम राघवन – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
४७. सुभाष घई – दिग्दर्शक, निर्माता आणि शिक्षणतज्ज्ञ
४८. सुब्रत चक्रवर्ती – प्रोडक्शन डिझायनर
४९. सुजॉय घोष – पटकथा लेखक आणि दिग्दर्शक
५०. स्वप्नील सोनावणे – सिनेमॅटोग्राफर आणि निर्माता
५१. तनुज गर्ग – चित्रपट निर्माता
५२. विद्या बालन – अभिनेत्री
५३. विनय कुमार – अभिनेता, दिग्दर्शक आणि नाट्य संशोधक