दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे. कालच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गांधीहत्या ही घटना कायमच वादग्रस्त राहिली आहे. आतापर्यंत ज्या अभिनेत्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली त्यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत ट्रेलर लॉंचच्या वेळी चिन्मयला प्रश्न विचारला गेला असता त्याने त्याची भूमिका स्पष्टपणे मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मय म्हणाला, “आतापर्यंत अनेक कलाकारांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. विशेषकरून मराठी रंगभूमीवर ही भूमिका जेव्हा जेव्हा केली आहे तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्या वादाकडे किती लक्ष दिलं पाहिजे हे तुमच्यावर आहे. आजकाल तुम्ही रस्त्यावर भेळपुरी खायला जाल तरी त्यावरून होतील असं वातावरण आहे. त्यामुळे वाद निर्माण करायला आज कोणतीही अक्कल लागत नाही. एक कलाकार म्हणून आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे.”

आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

पुढे तो म्हणाला, “मला जेव्हा या चित्रपटाची विचारणा झाली, जेव्हा राजजींनी मला चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा या चित्रपटाचं नेमकं काय म्हणणं आहे याचा मी विचार केला. जार् चित्रपटाचं म्हणणं महत्वाचं असेल, चित्रपटातून जो उद्देश आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो जर महत्वाचा असेल तर तुम्ही नायक, खलनायक किंवा अगदी रावणाची भूमिका जरी साकारली तरी ते महत्वाचं नसतं. त्या चित्रपटातून देण्यात येणारा संदेश, चित्रपटाचं म्हणणं अधिक महत्वाचं असतं.”

“जेव्हा तुम्ही नथुराम गोडसेसारखी भूमिका साकारता जी एक वादग्रस्त भूमिका आहे, तेव्हा यातून वाद निर्माण होऊ शकतो हे मनात कुठेतरी माहीत असतं. पण मी याचा जास्त विचार करत नाही. त्यापलीकडे मी विचार केला तर मी ती भूमिका साकारू शकत नाही. अभिनय करणं हे माझं काम आहे. वाद निर्माण करणं माझं काम नाही. ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी करावे.”

हेही वाचा : Gandhi Godse – Ek Yudh Trailer : “गोडसे एका दिवसात बनता येतं, पण गांधी…” जबरदस्त डायलॉग, दर्जेदार अभिनय; ‘गांधी गोडसे’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे. या चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांचं वैचारिक युद्ध पहायला मिळणार आहे. २६ जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinmay mandlekar shared his views of controvercy about nathuram godse role rnv
First published on: 12-01-2023 at 13:55 IST