scorecardresearch

कपिल शर्माचा ‘ज्विगाटो पाहून कोरियन प्रेक्षकांना अश्रू अनावर; अभिनेता म्हणाला, “मी विनोदी…”

आपल्या विनोदाने हसवणारा कपिल या चित्रपटात एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे

kapil sharma final 2
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. नुकताच मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलरचा ग्रँड सोहळा पार पडला. हा चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. तिकडच्या अनुभवावबद्दल कपिल शर्माने नुकतेच भाष्य केलं आहे.

२०१३ मध्ये आलेल्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली. या काळात त्याने काही विनोदी चित्रपटदेखील केले. मात्र आता तो ‘ज्विगाटो चित्रपटातून एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक होत आहे. ट्रेलर लाँच सोहळ्यात तो असं म्हणाला, हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक रडत होते. विशेष म्हणजे त्या लोकांना माहितीदेखील नाही की मी एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निराशा होईल असे मला वाटत नाही.

‘ज्विगाटो’साठी माझी निवड का? कपिल शर्माच्या प्रश्नावर दिग्दर्शिका म्हणाली, “शाहरुख खानने होकार दिला…”

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात तो असं ही म्हणाला, “मी नंदिता दासचा चाहता आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कामाने प्रभावित होता तेव्हा तुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवता. त्यांच्याकडे ठरविक काम असते. हे म्हणजे एकाच वर्षी दोन तीन चित्रपट करण्यासारखे नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत.हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 12:08 IST
ताज्या बातम्या